दुखापतीतून सावरण्यासाठी चक्क मध्यरात्री व्यायाम करतोय हा खेळाडू, VIDEO व्हायरल

दुखापतीतून सावरण्यासाठी चक्क मध्यरात्री व्यायाम करतोय हा खेळाडू, VIDEO व्हायरल

सराव सामन्यात रसेलला दुखापत झाली होती. या दुखापतीतून सावरण्यासाठी मेहनत करत आहे.

  • Share this:

कोलकाता, 19 एप्रिल : आयपीएलचं बारावं हंगाम खऱ्या अर्थानं कोण गाजवत असेल, तर ते आहेत कॅरेबियन खेळाडू. त्यात आंद्रे रसेलनं तर, सर्व संघातल्या खेळाडूंची पिसं काढली. आतापर्यंत कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी जवळ जवळ सर्वच सामने रसेलनं जिंकून दिले. आज कोलकाताचा संघ विराटच्या रॉयल चॅलेंजर्च बंगळुरू विरोधात लढत आहे.

दरम्यान या सामन्यात रसेल खेळणार की नाही याबाबत साशंकता आहे. सराव सामन्यात रसेलला दुखापत झाली होती. पण रसेल मात्र या दुखापतीतून सावरण्यासाठी मेहनत करत आहे.

रसेल चक्क रात्री 2.34 वाजता, जोर जोरात गाणी लावत व्यायाम करत होता. आपल्या व्यायामाचा व्हिडिओ रसेलनं स्वत: आपल्या इंस्टाग्राम अकाऊंडवर शेअर केला. या व्हिडिओत रसेल सायकलिंग करताना दिसत आहे. या व्हिडिओला रसेलनं, जेव्हा सगळे जोपतात, तेव्हा मी मेहनत करतो. रसेल सध्या व्यायामाच्या मदतीनं दुखापतीतून सावरण्याचा प्रयत्न करत आहे.

 

View this post on Instagram

 

2:5am #focus while your sleeping am #working!😏

A post shared by Andre Russell (@ar12russell) on

आज कोलकाताचा संघ आपल्या होम ग्राऊंडवर म्हणजे इडन गार्डनवर बंगळुरू विरोधात खेळणार आहे. सुरुवातीच्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर कोलकाताचा संघ लयीत दिसला नाही. दरम्यान प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी कोलकात्यालाला सहापैकी चार सामने जिंकावेच लागतील. त्यातील तीन सामने घरच्या मैदानावर होणार आहेत. आरसीबीला उर्वरित सर्व सामने जिंकावे लागणार आहे. एवढंच नाही तर त्यांना हा विजय मोठ्या फरकाने मिळवावा लागेल. त्याशिवाय इतर संघांच्या कामगिरीवर त्यांचा प्लेऑफचा प्रवेश होणार की नाही ते ठरणार आहे.

आरसीबीकडून कर्णधार विराट कोहली आणि एबी डीव्हिलियर्स यांनी चांगली कामगिरी केली असली तरी सांघिक कामगिरीत आरसीबी कमी पडत आहे. वेगवान गोलंदाजांची तगडी फौज असतानाही त्यांना फारसे यश मिळालेलं नाही. नवखा गोलंदाज नवदीप सैनी वगळता इतर गोलंदाज फ्लॉप ठरले आहेत. उमेश यादवला फक्त 2 विकेट घेता आल्या आहेत. तर नाथन नाइल दुखापतीमुळे खेळू शकला नाही. त्याच्या जागी डेल स्टेनला संघात घेतलं आहे.

VIDEO : रावसाहेब दानवे माझी मेहबुबा, खोतकरांची तुफान फटकेबाजी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 19, 2019 05:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading