IPL 2019 : आंद्रे रसेलचं वादळ म्हणजे, प्रतिस्पर्ध्यांची डोकेदुखी

IPL 2019 : आंद्रे रसेलचं वादळ म्हणजे, प्रतिस्पर्ध्यांची डोकेदुखी

रसेलनं 13 चेंडूत केलेल्या 48 धावांनी बंगळुरूच्या हाताशी आलेला सामना हिसकावून घेतला.

  • Share this:

बेंगळुरु, 06 एप्रिल : आयपीएलच्या या हंगामात पहिल्या सामन्यापासून मैदान गाजवलं ते एका खेळाडूनं, तो खेळाडू म्हणेज आंद्रे रसेल. रसेलच्या वादळापासून कोणताच गोलंदाज वाचू शकला नाही. बंगळुरुविरुद्धच्या सामन्यातही रसेलचा असाच जलवा पाहायला मिळाला.  आरसीबीने दिलेल्या 206 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना केकेआरच्या सलामीवीरांनी चांगली सुरूवात केली. मात्र एका क्षणी अशक्यप्राय वाटणारं हे आव्हान रसेलनं अगदी सहज पार केलं.

रसेलनं 13 चेंडूत 1 चौकार आणि 7 षटकारांच्या सहाय्यानं 48 धावा केल्या. आतापर्यंतच्या सामन्यात रसेलचे हेच षटकार प्रतिस्पर्ध्यांसाठी डोकेदुखी ठरत असल्याचं समोर आलं आहे. आयपीएलच्या या हंगामात रसेलनं 22 षटकार ठोकले आहेत. यापैकी हैदराबाद आणि बंगळुरुविरुद्धच्या सामन्यात रसेलच्या खेळीमुळे कोलकात्याने सामन्यात बाजी मारली आहे.

तर, दुसरीकडं, सलग चार पराभव पदरी पडल्यानंतर बंगळुरुच्या संघानं कोलकात्याविरुद्ध सामन्यात चांगली कामगिरी केली. पण पराभवानं काही विराट कोहलीची पाठ सोडलेली नाही. रसेलनं सामन्यातील 19व्या षटकात तब्बल 29 धावा कुटल्या. या हंगामात आतापर्यंत रसेलनं सर्वात जास्त षटकार खेचले आहेत. त्याची ही खेळी बंगळुरूच्या खेळाडूंसाठी वाईट स्वप्न ठरणार आहे.

VIDEO: दानवेंची पुन्हा एकदा 'गलती से मिस्टेक'; पाहा काय म्हणाले..

First published: April 6, 2019, 8:21 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading