कोलकाता, 27 मार्च: आयपीएलच्या बाराव्या हंगामाला दणक्यात सुरूवात झाली आहे. कोलकता संघानं या मोसमातील अटीतटीच्या अशा पहिल्याच सामन्यात आंद्रे रसेल आणि नितेश राणा यांनी घरच्या प्रेक्षकांसमोर विजय खेचून आणला. रसेलनं 19 चेंडूंत नाबाद 49 धावांची धडाकेबाज खेळी केली. त्याच्या या तुफान फटकेबाजीमुळेच हैदराबादला पराभव पत्करावा लागला. पण, याच रसेलनं नुकतेच सर्व नियमांचे उल्लंघन करत, सर्वांचे लक्ष वेधले.
Wanna know what @Russell12A does when he's not on the field?
आज कोलकता आपला दुसरा सामना पंजाबशी खेळणार आहे. या सामन्याआधी दोन्ही संघ दणक्यात सराव करत असताना, रसेलनं मात्र सर्व नियम मोडत अनोखा सराव केला. त्यानं चक्क राहत असलेल्या हॉटेलचेच नियम मोडले. हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला आहे. रसेलनं हॉटेलच्या लॉबीतच गोलंदाजीचा सराव केला आणि या व्हिडीओत त्यानं कबुलही केलं की तो हॉटेलचे नियम मोडत आहे. कारण तो रसेल आहे आणि कुठंही सराव करु शकतो.
कोलकताचा दुसरा सामनाही त्यांच्या घरच्याच मैदानावर होत आहे. या सामन्यात गेल विरुद्ध रसेल असा सामना पाहायला मिळणार आहे. कोलकता आणि पंजाब यांच्यात आतापर्यंत 23 सामने झाले आहेत. त्यातील 15 सामने कोलकताच्या संघाने तर, 8 सामने पंजाबनं जिंकले आहेत.