वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या 'या' खेळाडूला अटक, क्रिकेटपटूंना फसवल्याप्रकरणी जेलमध्ये रवानगी

वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या 'या' खेळाडूला अटक, क्रिकेटपटूंना फसवल्याप्रकरणी जेलमध्ये रवानगी

क्रिकेटच्या दुनियेत असंख्य खेळाडू आपलं नशीब आजमवण्यासाठी अखंड मेहनत करत असतात.

  • Share this:

विजयवाडा, 03 मे : भारतात क्रिकेट या खेळाला अनन्य साधारण महत्त्व आहे. या खेळाची खेळाडू पूजा करतात. याच क्रिकेटच्या दुनियेत असंख्य खेळाडू आपलं नशीब आजमवण्यासाठी अखंड मेहनत करतात. सध्या भारतात आयपीएलमुळं क्रिकेटमय वातावरण झालं आहे. यातच भारताचा एक पुर्व खेळाडू ज्याच्या नावावर अनेख विक्रम आहेत, अशा खेळाडूनं असा काही कारनामा केला आहे पोलिसांनी थेट त्याला तुरुंगात डामलं.

हा खेळाडू भारतीय क्रिकेट बोर्डाचे मुख्य संचालक एमएसके प्रसाद बनून क्रिकेटपटूंना फसवत होता. दरम्यान आज त्यांना विजयवाडा पोलिसांनी अटक केली. गुरुवारी त्याच्याविषयी एक तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर आज आंध्रप्रदेशकडून रणजी खेळणाऱ्या या खेळाडूला अटक करण्यात आली. बुडुमुरु नागराजू असे या खेळाडूचे नाव असून, या खेळाडूनं रणजीमध्ये आंध्रप्रदेशला अनेक सामने जिंकून दिले आहेत. नागराजूवर एमएसके प्रसाद बनून अनेक क्रिकेटपटूंना फसवल्याचा आरोप आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागराजू श्रीकाकुलम भागात राहणारा आहे. या खेळाडूनं साऊथ झोन (2011) आणि सेंट्रल झोनसह (2013) अनेक रणजी सामने खेळले आहेत. 2014 साली नागराजूनं रणजीमध्ये आंध्रप्रदेश संघाचे नेतृत्व केले होते. एवढंच नाही तर, 2016मध्ये नेटमध्ये 82 तास खेळल्यानंतर नेटमध्ये सर्वात जास्त काळ खेळल्यामुळं त्याच नाव गिनीज बुकमध्ये नोंदवण्यात आलं होतं. मात्र सध्या हा रेकॉर्ड विराग मोरे नावाच्या खेळाडूवर आहे. त्यानं 50 तास सलग नेटमध्ये फलंदाजी केली आहे.

आणि तरुणी जोरात पडल्या...'फानी'च्या रौद्ररुपाचा आणखी एक VIDEO

First published: May 3, 2019, 9:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading