VIDEO : जेम्स अँडरसनची सटकली, फाडला 'या' भारतीय खेळाडूचा फोटो

किंग्स इलेव्हन पंजाबचा कर्णधार आर अश्विन सध्या चर्चेत आहे तो मांकड रनआउटमुळे...

News18 Lokmat | Updated On: Apr 1, 2019 05:07 PM IST

VIDEO : जेम्स अँडरसनची सटकली, फाडला 'या' भारतीय खेळाडूचा फोटो

मुंबई, 1 एप्रिल : आयपीएलचा बारावा हंगाम अनेक कारणांमुळं गाजत आहे. यात एक प्रकरण चांगलेच तापत आहे ते म्हणजे, किंग्स इलेव्हन पंजाबचा कर्णधार आर अश्विन यानं केलेल्या  मांकड रनआउट.

राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात अश्विननं सलामीवीर जोस बटलरला मांकड नियमानुसार धावबाद केले. त्याच्यानंतर सोशल मीडीयावर विविध प्रतिक्रिया उमटल्या, अश्विनला ट्रोलही करण्यात आले. या कृतीवर अनेक माजी क्रिकेटपटूंनी नाराजी व्यक्त केली. बटलरची ही विकेट सामन्याला कलाटणी देणारी ठरली.पण इंग्लंडचा जलद गोलंदाज जेम्स अँडरसन याला आपल्या सहकाऱ्याला अशा पद्धतीनं बाद करणाऱ्या अश्विनवर चांगलाच संतापला. त्यानं चक्क अश्विनचा फोटो मशीनमध्ये टाकून त्याचे असंख्य तुकडे केले.

मंकड आऊट म्हणजे काय?

40च्या दशकात भारताकडून खेळणारा सलामीवीर होता विनू मंकड. विनू मंकड डावखुरा स्लो बोलर म्हणूनही खेळत असे. भारताचा हा अष्टपैलू महान खेळाडू 1947-48 दरम्यान अशाच पद्धतीच्या वादात अडकला होता. त्या वेळी भारताचा संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विनू मंकडने बिल ब्राऊन या ऑस्ट्रेलियन फलंदाजाला वेगळ्याच पद्धतीने आऊट केलं. बिल नॉन स्ट्राईकिंग एंडला असतानाच बोलिंग करत असलेल्या मंकडने अचानक बेल्स उडवल्या. क्रिकेटच्या नियमाप्रमाणए क्रीजमध्ये नसल्याने बिल ब्राऊन आऊट झाला.


rong>VIDEO: 'या नेत्याला ओळखा आणि 101 रुपये मिळवा'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 1, 2019 05:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...