• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • जबरा फॅन! धोनीला भेटण्यासाठी केली 1435 किमी पदयात्रा, माही भेटल्यानंतर त्याला म्हणाला...

जबरा फॅन! धोनीला भेटण्यासाठी केली 1435 किमी पदयात्रा, माही भेटल्यानंतर त्याला म्हणाला...

टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनीचे (MS Dhoni) करोडो फॅन्स आहेत. हरयणातील धोनीच्या फॅननं माहीच्या एका भेटीसाठी 1436 किमी पायी प्रवास केला.

 • Share this:
  रांची, 18 नोव्हेंबर: टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनीचे (MS Dhoni) करोडो फॅन्स आहेत. तर काही जणांचा स्वत: धोनी एका भेटीत फॅन होतो. अजय गिल असाच एक धोनीचा जबरा फॅन आहे. धोनीची फक्त एक भेट मिळावी म्हणून हरयाणातून रांचीपर्यंत 1436 किलोमीटर पायी प्रवास केला. धोनीनं त्याची ही इच्छा पूर्ण केली. त्याचबरोबर त्याची गळाभेट घेत 'आय लव्ह यू' असंही म्हंटलं. धोनीनं फक्त त्याची भेट घेतली नाही, तर त्याला घरातही बोलावलं. तसेच त्याच्यासोबत सेल्फी देखील काढली. त्याच्या राहण्याची व्यवस्थाही धोनीनं स्वत:च्या फार्म हाऊसमध्ये केली होती. अजयच्या बॅटवर धोनीनं स्वाक्षरी केली. तसंच त्याला परत जाण्यासाठी विमानाच्या तिकीटाची व्यवस्था देखील धोनीनंच केली. हरयाणातील जलान खेडामध्ये राहणारा 18 वर्षांचा अजय गिल हा धोनीचा जबरा फॅन म्हणून प्रसिद्ध आहे. धोनीला भेटण्यासाठी त्यानं तीन महिन्यात दुसऱ्यांदा रांचीपर्यंत पदयात्रा काढली आहे. यापूर्वी त्यानं 16 दिवसांमध्ये 1436 किलोमीटर अंतर पूर्ण केले होते. यंदा त्याला हा प्रवास करण्यासाठी 18 दिवस लागले. माहीला भेटल्यानंतर आपलं आयुष्य धन्य झालं अशी भावना अजयनं व्यक्त केली आहे. IND vs NZ: माजी क्रिकेटपटूनं सांगितली रोहित शर्माच्या कॅप्टनसीमधील चूक अजयनं यावेळी सांगितलं की, मी क्रिकेट खेळतो आणि यामध्येच मला करिअर करायचं आहे. महेंद्रसिंह धोनीनं 15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यावेळी धोनीची भेट होईपर्यंत क्रिकेट खेळणार नाही, अशी प्रतिज्ञा मी केली होती. आता ती प्रतिज्ञा पूर्ण झाली आहे. मला धोनीचा आशिर्वाद मिळाला असून आता मी पुन्हा एकदा क्रिकेट खेळायला सुरूवात करणार आहे,' असं अजयनं सांगितलं. अजयनं धोनीसोबत एक फोटो देखील काढला असून तो सध्या वेगानं व्हायरल होत आहे.
  Published by:News18 Desk
  First published: