अमित शाह यांनी दिला 'या' पदाचा राजीनामा, 2014पासून सांभाळला होता पदभार

अमित शाह यांनी दिला 'या' पदाचा राजीनामा, 2014पासून सांभाळला होता पदभार

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी आपल्या सर्वात जुन्या पदाचा राजीनामा दिला आहे.

  • Share this:

गुजरात, 28 सप्टेंबर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी आपल्या सर्वात जुन्या पदाचा राजीनामा दिला आहे. अमित शाह यांनी आज गुजरात क्रिकेट असोसिएशनचा (Gujarat Cricket Association) राजीनामा दिला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी 2014मध्ये या पदाचा राजीनामा दिल्यानंतर अमित शाह यांच्याकडे गुजरात क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षपद होते. दरम्यान आता अमित शाह यांनी या पदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान आता अध्यक्षपदासाठी धनराज नाथवानी यांच्या नावाची चर्चा होत आहे.

टाईम्स ऑफ इंडियानं दिलेल्या माहितीनुसार, 2014मध्ये अमित शाह जीसीएच्या अध्यक्षपदी विराजमान झाले होते. अमित शाह यांनी सर्वोच्च न्यायालय आणि लोढा समितीनं यांच्या शिफारशी लक्षात ठेवता आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान अमित शाह यांचे चिरंजीव जय शाह सह सचिव पदी कायम आहेत. 2014मध्ये अमित शाह यांनी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाचा स्वीकार केल्यानंतर हे शाह जीसीएचे अध्यक्ष झाले होते. मात्र आता त्यांनी गृहमंत्रीपद स्वीकारल्यानंतर या पदाचा राजीनामा दिला आहे.

जीसीए उपाध्यक्षांनी सादर केला राजीनामा

जीसीएचे उपाध्यक्ष परिमल नाथवानी यांनी सुध्दा आपल्या पदाचा राजीनामा सादर केला आहे. त्यामुळं त्यांचा मुलगा धनराज आता ही जबाबदारी स्वीकारणार आहेत. तर, परिमल नाथवानी हे गुजरात क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होऊ शकतात.

शाह अध्यक्ष असताना सरदार पटेल स्टेडिअमचे झाले होते नवनिर्माण

अमित शाह अध्यक्ष असताना अहमदाबाद येथीळ मोटेरा येथे सरदार पटेल मैदानाच्या नवनिर्माणाचे काम सुरू झाले हेते. या स्टेडिअमचे काम आता पूर्ण झाले आहे. येत्या काही महिन्यात हे मैदान आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी खुले होऊ शकते. या स्टेडियमध्ये 1.10 प्रेक्षकांच्या बसण्याची सोय असणार आहे.

अजित पवारांना भर पत्रकार परिषदेत अश्रू अनावर, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: Amit Shah
First Published: Sep 28, 2019 06:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading