Boxing World Championship : अमित पांघलने जिंकलं ऐतिहासिक रौप्य; सुवर्णपदक हुकलं

Boxing World Championship : अमित पांघलने जिंकलं ऐतिहासिक रौप्य; सुवर्णपदक हुकलं

भारतीय बॉक्सर अमित पांघलला सुवर्णपदक जिंकण्याची संधी होती. पण उजबेकिस्तानच्या बॉक्सरने एकतर्फी लढत जिंकली.

  • Share this:

नवी दिल्ली, 21 सप्टेंबर : भारताचा बॉक्सर अमित पांघलला वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागला. त्याचा पराभव झाला असला तरीही त्यानं ऐतिहासिक रौप्यपदकाची कमाई केली आहे. बॉक्सिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक मारलेला तो पहिलाच भारतीय ठरला. त्याला 52 किलोग्रॅम वजनी गटात उजबेकिस्तानच्या शाखोबिदिन जोईरोव्हकडून पराभूत व्हावं लागलं. शाखोबिदिनने एकतर्फी 5-0 असा विजय मिळवला.

जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत आतापर्यंत भारताला एकदाही दोन पदके पटकावता आली नव्हती. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करणारा अमित हा पहिला खेळाडू ठरला आहे. दरम्यान त्याच्यासोबत स्पर्धेत असलेल्या भारताच्या मनिष कौशिकला मात्र 63 किलो वजनी गटात उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला.

अमितनं 2018च्या आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. तर, 2018च्या राष्ट्रकुल स्पर्धेत त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते.

कौशिकचा पराभव क्युबाच्या अव्वल मानांकित अँडी गोमेझ क्रूझनं केला. क्रूझने 2017च्या जागतिक स्पर्धेत 64 किलो गटात सुवर्णपदक तसेच पॅन अमेरिकन स्पर्धेत दोन वेळा विजेता होण्याचा मान पटकावला होता.

आतापर्यंत जागतिक स्पर्धेत विजेंदर सिंग (2009), विकास कृष्णन (2011), शिवा थापा (2015) आणि गौरव बिदुरी (2017) यांनी भारताला पदके मिळवून दिली आहेत.

VIDEO : सातारा पोटनिवडणूक होणार नाही, उदयनराजेंबद्दल भाजपची पहिली प्रतिक्रिया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 21, 2019 08:32 PM IST

ताज्या बातम्या