क्रिकेटरनं भारताकडून केलं पदार्पण नंतर पाकिस्तानसाठी खेळला!

भारताकडून पदार्पण केल्यानंतर त्यानं भारताविरुद्धच अखेरचा सामना खेळला.

News18 Lokmat | Updated On: Sep 1, 2019 10:32 AM IST

क्रिकेटरनं भारताकडून केलं पदार्पण नंतर पाकिस्तानसाठी खेळला!

काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावाचे वातावरणं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दोन्ही देशांमध्ये कट्टर प्रतिस्पर्धा आहे. याचा परिणाम क्रिकेटवरही झाला आहे. गेल्या काही वर्षांत भारत-पाक मालिका झालेली नाही. फक्त आयसीसी आणि आशियाई क्रिकेट परिषदेकडून भरवल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्येच दोन्ही संघ आमने सामने येतात.

एक काळ असाही होता की काही खेळाडू दोन्ही देशांकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले होते. यामध्ये आमिर इलाही यांचंही नाव आहे. 11 सप्टेंबर 1908 मध्ये त्यांचा जन्म लाहोरमध्ये झाला होता. भारत स्वतंत्र झाल्यानंतर त्याने भारताकडून कसोटीत प्रतिनिधित्व केलं होतं.

भारतीय संघात गोलंदाज म्हणून ऑस्ट्रेलियाविरुद्ध आमिर इलाहीनं पदार्पण केलं होतं. मात्र त्याला एकही चेंडू टाकण्याची संधी मिळाली नव्हती. फलंदाजीत पहिल्या डावात 10 व्या क्रमांकावर येताना 4 धावा तर दुसऱ्या डावात थेट सलामीला उतरला होता. यात त्यानं 13 धावा केल्या.

आमिर इलाहीनं भारताकडून पदार्पण आणि भारताविरुद्धच अखेरचा सामना खेळला होता. त्यानं पहिला सामना खेळल्यानंतर पाकिस्तानच्या संघाकडून पुढचे पाच सामने खेळले. ते सर्व भारताविरुद्ध होते.

1952 मध्ये चेन्नईत भारताविरुद्धच्या कसोटीत आमिरनं 6 कसोटी सामन्यांच्या कारकिर्दीतील सर्वोच्च 47 धावा केल्या. त्यानं एकूण 82 धावा तर 7 विकेट घेतल्या. आमिर इलाहीशिवाय गुल मोहम्मद आणि अब्दुल कारदार हे दोघे भारत आणि पाकिस्तानकडून क्रिकेट खेळले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 1, 2019 10:32 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...