Home /News /sport /

फुटबॉलपटूनं भर मैदानात केलं गर्लफ्रेंडला प्रपोज, वाचा पुढे काय झालं...

फुटबॉलपटूनं भर मैदानात केलं गर्लफ्रेंडला प्रपोज, वाचा पुढे काय झालं...

स्टिफसन हा अमेरिकेतील मिनेसोटा या फुटबॉल क्लबचा सदस्य आहे. त्याच्या टीमची सॅन जोसे टीम विरुद्ध झालेली मॅच 2-2 अशी बरोबरीत सुटली.

    मुंबई, 5 जुलै: आवडत्या व्यक्तीला प्रपोज करण्यासाठी आणि तिने प्रपोज केल्यानंतर नकार देऊ नये म्हणून वातावरण निर्मिती करण्यात प्रेमवीर पुढे असतात. आयुष्यातील मोठा क्षण हटके पद्धतीनं साजरा करण्याचा ट्रेंड सध्या वाढत आहे. हसानी टॉटसन स्टिफसन हा अमेरिकेचा फुटबॉलपटू (American Football Player) सध्या याच कारणामुळे चर्चेत आहे. त्याने गर्लफ्रेंडला केलेल्या प्रपोजची चर्चा जगभर रंगली आहे. स्टिफसन हा अमेरिकेतील मिनेसोटा या फुटबॉल क्लबचा सदस्य आहे. त्याच्या टीमची सॅन जोसे टीम विरुद्ध झालेली मॅच 2-2 अशी बरोबरीत सुटली. ही मॅच बरोबरीत सुटताच स्टिफसन प्रेमाच्या पिचवर गोल करण्यासाठी पुढे आला.  त्याने फुटबॉलच्या मैदानातच सर्वांच्या देखत गर्लफ्रेंड  पेट्रा वुकोविकला प्रपोज केले. (American footballer proposed his girlfriend on ground) त्याने प्रपोज करताच दोन्ही टीमचे खेळाडू आणि फॅन्सनी टाळ्यांच्या गजरात अभिनंदन केले. स्टीफसनची पार्टनर पेट्रा वुकोविकनं इन्स्टाग्रामवर (Instagram) या प्रसंगाबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत. 'माझा आनंद शब्दामध्ये व्यक्त करण्यास मी असमर्थ आहे. आमच्या सुंदर नात्याला पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे आभार.' अशी भावना पेट्राने व्यक्त केली असून त्यांचा फोटो देखील शेअर केला आहे. तो फोटो देखील सध्या चांगलाच व्हायरल (Viral) झाला आहे. IPL Mega Auction: सुरेश रैना की ऋतुराज गायकवाड? धोनीसमोर मोठा प्रश्न फुटबॉल विश्वात सध्या युरो कप (Euro Cup 2020) आणि कोपा अमेरिका (Copa America) या दोन मोठ्या स्पर्धांची धूम सुरु आहे. या दोन स्पर्धांच्या झगमगाटातही अमेरिकेतील क्लब मॅच दरम्यानची ही अनोखी घटना फॅन्समध्ये चर्चेचा विषय बनली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Football, Love story, Photo viral

    पुढील बातम्या