निवृत्तीनंतर पुन्हा क्रिकेट मैदानावर उतरणार अंबाती रायडू, 'या' संघाकडून करणार पदार्पण

निवृत्तीनंतर पुन्हा क्रिकेट मैदानावर उतरणार अंबाती रायडू, 'या' संघाकडून करणार पदार्पण

वर्ल्ड कप संघात जागा न मिळाल्यामुळं अंबाती रायडूनं वयाच्या 33व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

  • Share this:

चेन्नई, 16 ऑगस्ट : इंग्लंडमध्ये झालेल्या आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियात संधी न मिळाल्यामुळं अंबाती रायडूनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. मात्र, रायडू आता पुन्हा मैदानात उतरण्यास सज्ज झाला आहे. 19 ऑगस्टपासून चेन्नईमध्ये होणारऱ्या TNCA एकदिवसीय टूर्नामेंटमध्ये पार्थसार्थी ट्रॉफीमध्ये खेळणार आहे. स्पोर्ट्सस्टारनं दिलेल्या माहितीनुसार रायडू फॉर्ममध्ये राहण्यासाठी या स्पर्धेत भाग घेतल आहेत.

दरम्यान वर्ल्ड कपमध्ये राखीव खेळाडू म्हणून संघात सामिल करूनही संघात निवड न झाल्यामुळं निराश होत रायडूनं निवृत्ती घेतली. त्यामुळं निवृत्तीनंतर पहिल्यांदाच रायडू कोणत्यातरी स्पर्धेत सहभागी होणार आहे. दरम्यान, रायडूनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी, चेन्नई सुपरकिंग्जकडून आयपीएल खेळत राहणा आहे.

आयपीएलमुळं घेतला पार्थसार्थी ट्रॉफीमध्ये खेळण्याचा निर्णय

अंबाती रायडूनं निवृत्तीनंतर पार्थसार्थी ट्रॉफी खेळण्याचा निर्णय हा आयपीएलमुळं घेतला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण रायडूनं अद्याप आयपीएलमधून निवृत्ती घेतलेली नाही. दरम्यान रायडू अबु धाबीमध्ये होणाऱ्या टी-20 लीगमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चा होत्या. ही स्पर्धात 15 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.

वाचा-युवराज सिंगला प्रशासकीय समितीनं दिला मोठा धक्का, हातात बॅटही घेऊ शकणार नाही?

नैराश्यामुळं घेतली निवृत्ती

अंबाती रायडूनं वयाच्या 33व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. वर्ल्ड कप संघात जागा न मिळाल्याच्या नैराश्यातून हा निर्णय त्यानं घेतला. रायडूच्या जागी विजय शंकरला संघात जागा देण्यात आली. दरम्यान शंकर जखमी झाल्यानंतर मयंक अग्रवालला संघात स्थान मिळाले. यामुळं रायडूनं आपली निवृत्ती जाहीर केली असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांनी रायडू तंदुरूस्त नसल्यामुळं त्याला संघात दिले नाही, असे सांगितले होते.

वाचा-धोनीला चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार करणाऱ्या भारतीय क्रिकेटरने संपवले जीवन!

SPECIAL REPORT : 'झक्कास' शब्दावरून अनिल कपूर 'या' उद्योगपतीला खेचणार कोर्टात?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 16, 2019 04:46 PM IST

ताज्या बातम्या