• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • World Cup : अंबाती रायडूनं निवड समितीला मारला खोचक टोमणा

World Cup : अंबाती रायडूनं निवड समितीला मारला खोचक टोमणा

भारतासाठी सगळ्यात जास्त सरासरी असणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अंबाती रायडूचा चौथा क्रमांक आहे. त्यानं 47.05च्या सरासरीनं धावा केल्या आहेत.

 • Share this:
  नवी दिल्ली, 16 एप्रिल : इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वचषकासाठी भारतानं सोमवारी 15 खेळाडूंच्या नावाची घोषणा केली. या संघाचं कर्णधारपद विराट कोहलीकडं आहे, तर उप कर्णधारपद हिटमॅन रोहित शर्माकडं आहे. दरम्यान या संभाव्य संघात काही नावं अनपेक्षित होती तर, काही प्रबळ दावेदार असलेल्या खेळाडूंना डावलण्यात आलं. यातलाच एक खेळाडू म्हणजे अंबाती रायडू. या संभाव्य संघात चौथ्या स्थानासाठी रायुडूला संधी मिळेल, असा अंदाज बऱ्याच जणांनी वर्तविला होता. पण निवड समितीनं मात्र अंबाती रायुडू डच्चू दिली. रायुडू या गोष्टीमुळं निराश झालेल्या रायडूनं निवडी समितीवरच खरपुस टीका केली आहे. निवड समितीचे अध्यक्ष प्रसाद यांनी चौथ्या स्थानासाठी केदार जाधव आणि विजय शंकर यांना पसंती दिल्यानं अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. दरम्यान, केदार आणि शंकरपेक्षा रायुडूला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा चांगला अनुभव आहे. तरीही त्याचा पत्ता कापण्यात आला यासगळ्यावर रायडू काय प्रतिक्रिया देतो याकडं सगळ्यांच लक्ष असताना, रायडूनं निवड समितीवर टीका करत, " आता थ्री-डी गॉगल घालून मी विश्वचषक पाहणार आहे." असं ट्विट केलं. अंबाती रायडूनं 2013 साली भारताकडून पर्दापण केलं होतं. त्यानंतर त्यानं भारताकडून 55 एकदिवसीय सामने खेळले आहेत. मात्र असं असूनही केवळ 7 आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या विजय शंकर या अष्टपैलु खेळाडूची वर्णी भारतीय संघात लागली. रायडूच्या एकदिवसीय क्रिकेटमधली सरासरी पाहिली तर, आपल्या लक्षात येईल की, अंबाती रायडूला वगळण्याचा हा निर्णय विराट कोहलीला आणि निवड समितीला महागात पडणार आहे. भारतासाठी सगळ्यात जास्त सरासरी असणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अंबाती रायडूचा चौथा क्रमांक आहे. त्यानं 47.05च्या सरासरीनं धावा केल्या आहेत. तर, प्रथम क्रमांकावर 59.57नं धावा करणाऱ्या भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याचा क्रमांक लागतो. आश्चर्याची बाब म्हणजे, रायडूनं सचिन पेक्षा जास्त सरासरीनं धावा केल्या आहेत. यामुळं माजी क्रिकेटपटू, क्रिकेट विश्लेषक आणि चाहत्यांनी निवड समितीच्या या संघावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. मधल्या फळीसाठी कोणताच खेळाडू अनुभवी नसल्यामुळं चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणार कोण, हा प्रश्न कायम आहे. दरम्यान निवड समितीचे अध्यक्ष एसएमके प्रसाद यांनी आपल्या पत्रकार परिषदेत अंबाती रायडूच्या नावाचा उल्लेखही केला नाही. दरम्यान, अंबाजी रायडूच्या या ट्विटवर त्याच्या चाहत्यांनी तर्क वितर्क लावत, विश्वचषकात माझी निवड झाली नाही, पण मी विश्वचषकात खेळतो आहे, हा आभास निर्माण करण्यासाठी मी आता थ्री-डी गॉगल घालेन, असा अर्थ असावा असा अंदाज वर्तविला जात आहे. तर काही चाहत्यांनी त्याच्या या ट्विटला दाद देतं, तु चांगलं हाताळलसं अशी तारीफ केली. तर, काही चाहत्यांनी 3D म्हणजे धोनी, धवन आणि दिनेश असा अंदाज वर्तवला. 2019 च्या वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, महेंद्रसिंह धोनी (यष्टीरक्षक), केदार जाधव, हार्दिक पंडय़ा, विजय शंकर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, रविंद्र जडेजा, दिनेश कार्तिक. VIDEO :...तर काँग्रेस नेत्याला विमानाच्या राॅकेटला बांधून बालाकोटमध्ये सोडलं असतं - फडणवीस
  First published: