• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • माझ्यात अजुन खूप क्रिकेट उरलंय, रायुडुनं सांगितलं निवृत्तीचं कारण!

माझ्यात अजुन खूप क्रिकेट उरलंय, रायुडुनं सांगितलं निवृत्तीचं कारण!

भारताचा क्रिकेटपटू अंबाती रायुडुनं वर्ल्ड कपवेळी अचानक निवृत्ती जाहीर केली होती.

 • Share this:
  मुंबई, 30 ऑगस्ट : भारताचा क्रिकेटपटू अंबाती रायुडुनं वर्ल्ड कपदरम्यान अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्याच्या निवृत्तीच्या निर्णयानं अनेकांना धक्का बसला होता. त्याला वर्ल्ड कपमध्ये स्टँडबाय खेळाडूंच्या यादीत असूनही शिखर धवन, विजय शंकर हे दुखापतग्रस्त झाल्यानंतर संघात स्थान मिळालं नव्हतं. त्यानंतर निवृत्तीची घोषणा केलेल्या अंबाती रायुडुनं आता यू-टर्न घेतला आहे. रायुडुनं हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या समितीचे सदस्य रत्नाकर शेट्टी यांना ईमेल पाठवला आहे. यात त्यानं म्हटलं आहे की, निवृत्ती घेण्याचा निर्णय मी भावनेच्या भरात घेतला आहे. मला अजूनही क्रिकेटच्या सर्व प्रकारात खेळायचं आहे. द हिंदूने दिलेल्या बातमीनुसार, अंबाती रायुडुनं म्हटलं आहे की, कठीण काळात माझी साथ देणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि नोएल डेविड यांचे आभार. या लोकांनी मला जाणीव करून दिली की माझ्यात अजून क्रिकेट बाकी आहे. मी हैदराबादकडून खेळण्यासाठी इच्छूक आहे. सप्टेंबर महिन्यापासून या संघासाठी मी उपलब्ध असेन असंही रायुडुनं म्हटलं आहे. हैदराबाद क्रिकेट संघाचे मुख्य निवडकर्ता नोएल डेविड यांनी रायुडुच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. त्यांनी हैदराबाद क्रिकेटसाठी ही चांगली बातमी असून रायुडुमध्ये अजून पाच वर्षांचं क्रिकेट बाकी आहे असं म्हटलं. रायडुनं चांगला निर्णय घेतला असून तो युवा खेळाडूंना तयार करण्यासाठी महत्त्वाचा ठरेल. गेल्या वर्षी त्याच्याशिवाय आम्हाला रणजी ट्रॉफीमध्ये संघर्ष करावा लागला होता. रायुडुचा अनुभव संघासाठी महत्वाचा आहे. याचा सकारात्मक परिणाम बघायला मिळेलं. अंबाती रायुडुनं त्याचा अखेरचा प्रथम श्रेणीतला सामना नोव्हेंबर 2017 मध्ये खेळला होता. 97 प्रथम श्रेणी सामने खेळलेल्या रायुडुने भारताकडून 55 एकदिवसीय सामन्यात 1 हजार 694 धावा काढल्या आहेत. यात सर्वोच्च नाबाद 124 धावांचा समावेश आहे. याशिवाय त्यानं पाच टी20 सामने खेळले असून 42 धावा केल्या होत्या. 'ऑस्ट्रेलियाचा राजा', लालबागहून सातासमुद्रापार पोहोचली बाप्पाची भलीमोठी मूर्ती
  First published: