भारताच्या मिशन वर्ल्डकपला धक्का, या खेळाडूला ICCने केलं निलंबित

भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर असून आयसीसीसमोर चाचणी देईपर्यंत त्या खेळाडूला आंतरराष्ट्रीय सामन्यात गोलंदाजी करता येणार नाही.

News18 Lokmat | Updated On: Jan 28, 2019 02:17 PM IST

भारताच्या मिशन वर्ल्डकपला धक्का, या खेळाडूला ICCने केलं निलंबित

दुबई, 28 जानेवारी :न्यूझीलंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाला आयसीसीच्या एका निर्णयाने धक्का बसला आहे. भारतीय क्रिकेटपटू अंबाती रायडूवर आयसीसीने कारवाई केली आहे. अंबाती रायडूला गोलंदाजी करण्यास बंदी घातली असून त्याला निलंबित केलं आहे. त्याची गोलंदाजी आक्षेपार्ह असल्याची तक्रार करण्यात आली होती.

आयसीसीने अंबाती रायडुला 14 दिवसांत चाचणी देण्यास सांगितले होते. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. आता आयसीसीसमोर चाचणी देईपर्यंत त्याला आंतरराष्ट्रीय सामन्यात गोलंदाजी करता येणार नाही.

अंबाती रायडु फलंदाज म्हणून संघात खेळतो. मात्र ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर मोहम्मद शमी दुखापतग्रस्त झाल्यावर रायडुला त्याच्या जागी घेण्यात आलं होतं. रायडूने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात 22 व्या आणि 24 व्या षटकांत गोलंदाजी केली. यावेळी ऑस्ट्रेलियाचे फलंदाज उस्मान ख्वाजा आणि शॉर्न मार्श फलंदाजी करत होते.

आतापर्यंत रायडुने आंतरराष्ट्रीय सामन्यात गोलंदाजी करताना 46 मालिकांच्या 9 सामन्यांमध्ये तीन गडी बाद केले आहेत.


Loading...बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 28, 2019 02:16 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...