3D चष्मा आणि निवृत्तीच्या जाळ्यात अडकला रायडू, नेटकऱ्यांनी केले ट्रोल

3D चष्मा आणि निवृत्तीच्या जाळ्यात अडकला रायडू, नेटकऱ्यांनी केले ट्रोल

अंबाती रायडूनं निवृत्ती जाहीर केल्यानंतर त्यानं केलेल्या विजय शंकरवरच्या थ्रीडी चष्म्यावरून त्याला ट्रोल करण्यात आले आहे.

  • Share this:

मुंबई, 03 जुलै : भारताच्या मधल्या फळीचा फलंदाज अंबाती रायडूनं आज बीसीसीआयला पत्र लिहितं क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळं आता रायडू आइसलॅंडकडून क्रिकेट खेळणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. रायडूनं निवृत्ती जाहीर करण्यासाठी आइसलॅंड क्रिकेट बोर्डानं त्याला नागरिकत्वाची ऑफर दिली होती. त्यामुळंच रायडूनं निवृत्ती घेतली असल्याचे बोलले जात आहे.

याआधी वर्ल्ड कपकरिता भारतीय संघाची घोषणा होत असताना अंबाती रायडूच्या जागी विजय शंकरला संघात स्थान देण्यात आले होते. आता विजय शंकर दुखापतग्रस्त झाल्यानंतर राखीव ठेवण्यात आलेल्या रायडूला नाही तर मयंक अग्रवालला संघात स्थान देण्यात आले. यावर नेटकरी बीसीसीआय चांगलेच भडकले होते. आतापर्यंत 55 एकदिवसीय सामन्यात 1694 धावा केल्या आहेत. यात तीन शतक आणि 10 अर्धशतकांचा समावेश आहे. त्यानं 55 सामन्यात 47.05च्या सरासरीनं धावा केल्या आहेत. तर, आतापर्यंत 6 आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात 42 धावा केल्या आहेत. रायडूनं आतापर्यंत एकही कसोटी सामना खेळलेला नाही. गेल्या वर्षी रायडूनं प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती.

आता निवृत्ती घेतल्यानंतर सध्या सोशल मीडियावर रायडू ट्रेण्ड होत आहे. मात्र त्यानं विजय शंकरला थ्रीडी चष्म्यावरून डिवचले होते, त्यावरून आता त्याला ट्रोल करण्यात येत आहे. वर्ल्ड कपमध्ये विजय शंकरची घोषणा करताना बीसीसीआयचे निवड समिती प्रमुख एमएसके प्रसादनं विजय शंकर थ्रीडी खेळाडू आहे, असे म्हणाले होते. यावर रायडूनं, मी आता वर्ल्ड कप थ्रीडी गॉगल लावून पाहणार, असे ट्वीट केले होते. यावरून आता रायडूला ट्रोल करण्यात आले आहे.

आइसलॅंडकडून नागरिकत्वाची ऑफर

अंबाती रायडूला चक्क आइसलॅंड क्रिकेट बोर्डाकडून ऑफर देण्यात आली आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून नागरिकत्व मिळवण्याचे नियम आणि कायदे टाकले आहेत. तसेच, "अग्रवालनं 72.33च्या सरसरीनं केवळ तीन विकेट घेतल्या आहेत त्यामुळं अंबाती तू थ्रीडी चष्मा काढू शकतोस. आम्ही जी कागदपत्रे तयार केली आहेत, त्यासाठी सादा चष्माही पुरेसा आहे. तु आमच्या देशात ये, आम्हाला तुझी कदर आहे", असे मिश्किल ट्वीट केले आहे.

वाचा- मोठी बातमी, वर्ल्ड कपमधील शेवटच्या सामन्यात धोनी करणार क्रिकेटला अलविदा?

वाचा- धक्कादायक! क्रिकेटपटू अंबाती रायडूची निवृत्ती, IPLही खेळणार नाही

वाचा- भारतीय संघानं डावललं, अंबाती रायडूला क्रिकेट खेळण्यासाठी नागरिकत्वाची ऑफर!

VIDEO: मध्य रेल्वेचा गलथानपणा प्रवाशांच्या जीवावर

First published: July 3, 2019, 4:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading