हैदराबाद, : सनरायझर्स हैदराबादला 96 धावांत गुंडाळूव मुंबईने 40 धावांनी विजय मिळवला. हैदराबादचा त्यांच्याच घरच्या मैदानावर रोहितच्या पलटननं नमवलं. या सामन्यात अल्झारी जोसेफ यानं आपली कमाल दाखवत पर्दापणातच हैदराबादच्या सहा फलंदाजानं तंबूत पाठवले. या सामन्यात मलिंगाच्या जागी संधी मिळालेल्या अल्झारी जोसेफ यानं १२ धावांत ६ बळी टिपले. याबरोबरच त्याने IPL च्या इतिहासातील सर्वोत्तम गोलंदाजी केली.
तत्पूर्वी, सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्समध्ये सुरू असलेल्या सामन्यात हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मुंबईने 20 षटकांत 7 बाद 136 धावा केल्या. मुंबईने दिलेल्या 137 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादच्या डावाची सुरुवात चांगली झाली.
मात्र चौथ्या षटकात चहरने बेअरस्टोला बाद केले तर पाचव्या षटकात डेव्हिड वॉर्नर आणि सातव्या षटकात विजय शंकरला बाद करत अलझारी जोसेफने बाद केले. वॉर्नर 15 तर विजय शंकर 5 धावांवर बाद झाला. त्यानंतर मनिष पांडेला बेहरेनडॉर्फने बाद केले. तर युसुफ पठाणला खातेही खोलता आले नाही. राहुल चहरने त्याला बाद केले. त्यानंतर सिद्धार्थ कौल, भुवनेश्वर कुमार आणि राशिद खान यांना बाद करून अलझारी जोसेफने मुंबईला विजय मिळवून दिला.