क्रिकेटमधला अनोखा योगायोग, पती-पत्नीच्या कामगिरीची चर्चा होतेय व्हायरल

क्रिकेटच्या मैदानावर फक्त या कपलची चर्चा!

News18 Lokmat | Updated On: Nov 4, 2019 02:39 PM IST

क्रिकेटमधला अनोखा योगायोग, पती-पत्नीच्या कामगिरीची चर्चा होतेय व्हायरल

सिडनी, 04 नोव्हेंबर : पती पत्नीच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात असे म्हणतात. मात्र एका क्रिकेटपटूच्या गाठी या क्रिकेटच्या मैदानात बांधल्या गेल्या. पती-पत्नी दोघंही देशासाठी क्रिकेट खेळतात आणि एवढेच नाही तर दोघांन अनेकवेळा देशाला सामने जिंकवून दिले आहे. अशा या भन्नाट कपलची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे.

ऑस्ट्रेलियाचा जलद गोलंदाज मिशेल स्टार्क आणि त्याची पत्नी एलिसा हिली (Mitchell Starc) (Alyssa Healy) या दोघांनी एकाच दिवशी क्रिकेटचे मैदान गावजवले. दोन्ही पती-पत्नीनं आपल्या संघासाठी खेळलेल्या टी-20 सामन्यात मॅच विनिंग कामगिरी केली. या सामन्यात एलिसानं महिला संघाकडून शतकी कामगिरी केली. तर, स्टार्कनं पाकिस्तान विरोधात झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात विकेट घेत चांगली कामगिरी केली.

वाचा-पंतनं दिला धोका आणि मैदानात सुरु झाला धोनी...धोनीचा जयघोष!

वाचा-विराट-अनुष्का खास सेलिब्रेशनसाठी पोहचले भूटानला, भाजी मार्केटमधला PHOTO VIRAL

एलिसा हीलीची शानदार कामगिरी

एलिसा हीली महिला बीग बॅश लीगमध्ये मेलबर्न संघाकडून खेळते. या सामन्यात तिनं फक्त 52 चेंडूत शतकी कामगिरी केली. एलिसानं नाबाद 106 धावा केल्या. हीलीच्या शतकी खेळीच्या जोरावर संघानं 199पर्यंत मजल मारली. महत्त्वाचे म्हणजे गेल्या काही महिन्यांपासून हीली फॉर्ममध्ये आहे. महिन्याभरात हिलीनं 3 शतक केले. श्रीलंका विरोधात टी-20मध्ये 148 तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये 112 धावा केल्या. त्याशिवाय बीग बॅश लीगमध्ये 106 धावांची खेळी केली.

वाचा-हाच तो क्षण, हीच ती चुक! अन् भारतानं गमावला सामना; पाहा VIDEO

मिचेल स्टार्कनं उडवली फलंदाजांची झोप

एकीकडे एलिसा हीली आपल्या फलंदाजीनं गोलंदाजांना हैराण केलेल तर दुसरीकडे स्टार्क फलंदाजांची झोप उडवत आहे. सिडनीमध्ये सुरू असलेल्या ऑस्ट्रेलिया-पाक यांच्यातील टी-20 मालिकेत स्टार्कनं तुफान गोलंदाजी केली. स्टार्कनं पहिल्या टी-20 सामन्यात दोन विकेट घेतल पाकिस्तानच्या खेळाडूंना पुनरागमन करण्याची संधी दिली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 4, 2019 02:39 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...