मुंबई, 22 फेब्रुवारी : पुरुष खेळाडूंच्या बरोबरीने महिला खेळाडूंना देखील क्रिकेटमध्ये विविध स्पर्धांमध्ये खेळण्याची संधी मिळावी याकरता बीसीसीआयने महिला प्रीमियर लीगची घोषणा केली आहे. 4 मार्च पासून या महिला आयपीएलला सुरुवात होणार असून याकरता लिलाव प्रक्रिया 13 मार्च रोजी पारपडली. या लिलावात स्टार महिला क्रिकेटर्सना आपल्या संघात घेण्यासाठी त्यांवर फ्रँचायझींनी कोट्यवधींची बोली लावली. अशातच महिला प्रीमियर लिग महिन्याभरावर आली असताना यूपी वॉररिअर्स या संघाने त्यांच्या महिला कर्णधाराची घोषणा केली आहे.
यूपी वॉररिअर्सने आपल्या संघाचे कर्णधारपद हे ऑस्ट्रेलियाची स्टार विकेटकिपर आणि फलंदाज एलिसा हीली हिच्याकडे सोपवले आहे. एलिसा हीली ही फार अनुभवी क्रिकेटपटू असून तिने ऑस्ट्रेलियासाठी 139 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एक शतक आणि 14 अर्धशतकांसह जवळपास 2,500 धावा केल्या आहेत. तर टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 110 खेळाडूंना बाद करणाऱ्या सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक फलंदाजांच्या यादीत देखील ती आहे.
कर्णधारपद झाल्यानंतर हिली म्हणाली, "ऐतिहासिक महिला प्रीमियर लीगच्या सुरुवातीच्या टप्प्यात यूपी वॉरियर्सच्या कर्णधारपदाची जबाबदारी मिळाल्याने मला आनंद होत आहे. आम्ही सर्व महिला प्रीमियर लीगची ची आतुरतेने वाट पाहत होतो आणि यूपी वॉरियर्स हा एक उत्कृष्ट संघ आहे. मी स्पर्धेत खेळण्यासाठी उत्सुक आहे".
🏆 Five-time @T20WorldCup Champion 🌟 @cricketworldcup winner 🔥 Explosive wicketkeeper batter
Presenting the leader of our Warriorz, @ahealy77 👑#UPWarriorz #WPL pic.twitter.com/asmZyNs1fA — UP Warriorz (@UPWarriorz) February 22, 2023
महिला प्रीमियर लीगच्या लिलावात यूपी वॉररिअर्सने एलिसा हीली हिला ७० लाख रुपयांची बोली लावून खरेदी केली होते. तर भारतीय क्रिकेटर दीप्ती शर्मा हिला 2.16 कोटींची बोली लावून खरेदी केली होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Cricket news, IPL 2023, Women premier league 2023