Home /News /sport /

टीम इंडियात फूट, सिनियर खेळाडू विराटवर नाराज, थेट जय शाहंकडेच तक्रार

टीम इंडियात फूट, सिनियर खेळाडू विराटवर नाराज, थेट जय शाहंकडेच तक्रार

टीम इंडियामध्ये सारं काही आलबेल नसून ड्रेसिंग रूममध्ये फूट पडल्याचं वृत्त पुन्हा एकदा समोर आलं आहे. बुधवारी विराट कोहलीने (Virat Kohli Quits Captaincy) आपल्या टी-20 कर्णधारपदाचा राजीनामा दिला. टी-20 वर्ल्ड कपनंतर (T20 World Cup) आपण नेतृत्व सोडणार आहेत, पण वनडे आणि टेस्ट टीमचं नेतृत्व आपल्याकडेच असेल, असं विराट म्हणाला.

पुढे वाचा ...
    मुंबई, 18 सप्टेंबर : टीम इंडियामध्ये सारं काही आलबेल नसून ड्रेसिंग रूममध्ये फूट पडल्याचं वृत्त पुन्हा एकदा समोर आलं आहे. बुधवारी विराट कोहलीने (Virat Kohli Quits Captaincy) आपल्या टी-20 कर्णधारपदाचा राजीनामा दिला. टी-20 वर्ल्ड कपनंतर (T20 World Cup) आपण नेतृत्व सोडणार आहेत, पण वनडे आणि टेस्ट टीमचं नेतृत्व आपल्याकडेच असेल, असं विराट म्हणाला. खेळावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी आणि आपल्यावरचा तणाव कमी करण्यासाठी टी-20 फॉरमॅटची कॅप्टन्सी सोडत असल्याचं कारण विराटने दिलं. विराटच्या या स्पष्टीकरणानंतरही वाद काही कमी होत नाहीयेत. टीममधल्या वरिष्ठ खेळाडूने बीसीसीआय सचिन जय शाह (Jay Shah) यांच्याकडे विराटची तक्रार केल्याचं वृत्त इंग्रजी वृत्तपत्र द टेलीग्राफने दिलं आहे. साऊथम्पटनमध्ये झालेल्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलनंतर (WTC Final) विराट कोहलीने केलेल्या वक्तव्यानंतर ज्येष्ठ खेळाडूने जय शाह यांना फोन केला आणि टीममध्ये असुरक्षित वाटत असल्याचं सांगितलं. या पराभवानंतर टीममध्ये कलह निर्माण झाला आणि जय शाह यांनी स्थिती सुधारण्यासाठी यामध्ये दखल दिल्याचं द टेलिग्राफच्या वृत्तात म्हणलं आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये पराभव झाल्यानंतर विराटने टीममधल्या काही खेळाडूंच्या इंटेटविषयीच पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न उपस्थित केले होते. यानंतर नाराज झालेल्या वरिष्ठ खेळाडूने थेट जय शाह यांनाच संपर्क केला. विराट कोहली आणि निवड समितीमध्ये जोरदार खडाजंगी, या खेळाडूवरून झाला वाद! 'कोहलीचं नियंत्रण सुटत आहे, त्याने सन्मान गमावला आणि काही खेळाडू त्याच्या वागणुकीवर खूश नाहीत. तो आता प्रेरणा देणारा कर्णधार राहिला नाही आणि खेळाडूंकडून त्याला सन्मानही मिळत नाही. एका कोचने नेट प्रॅक्टिस सुरू असताना विराटला सल्ला दिला. तेव्हा मला कन्फ्यूज करू नकोस, असं विराटने सांगितल्याचा दावा सूत्रांनी केल्याचं द टेलिग्राफने आपल्या वृत्तात म्हणलं आहे. विराटच्या खांद्यावरचा तणाव कमी करण्याचा बीसीसीआयचा प्रयत्न आहे, ज्यामुळे तो आपल्या बॅटिंगवर लक्ष केंद्रीत करू शकेल. मागच्या दोन वर्षात विराटला एकही शतक करता आलेलं नाही. टी-20 वर्ल्ड कपचा निकाल काहीही लागला तरी वर्ल्ड कपनंतर रोहितकडे नेतृत्व देण्यात येणार होतं. 'रोहितला कॅप्टन बनवलं पाहिजे, कारण तो शांत आहे. अजिंक्य रहाणेसारखा. रहाणने ऑस्ट्रेलियात टीम इंडियाचं नेतृत्व केलं आणि भारताला विजय मिळवून दिला. रोहित एका मोठ्या भावासारखा आहे आणि तरुण खेळाडू त्याच्यावर विश्वास ठेवतात,' असं सूत्राने सांगितलं. Shocking! रोहित शर्माला टीम इंडियाच्या Vice Captain पदावरुन हटवण्याचा होता विराटचा प्लान
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: BCCI, Team india, Virat kohli

    पुढील बातम्या