नवी दिल्ली, 15 मार्च : भारतीय संघाचा सलामीचा फलंदाज शिखर धवन त्याच्या स्टाइलसाठी ओळखला जातो. डोक्याचे केस कमी आणि पिळदार मिशा ही त्याची ओळख आहे. मैदानावरही तो मिशांना पिळ मारताना दिसतो. आता त्याच्या मुलीनेही केसांची स्टाइल केली असून तिचं कौतुक केलं जात आहे. धवनची मोठी मुलगी आलिया धवन हिने इन्स्टाग्रामवर केस कापल्यानंतर फोटो शेअर केला आहे. तिनं कॅन्सरग्रस्तांसाठी केस कापण्याचा निर्णय घेतला.
आलियाने तिच्या नव्या हेअरस्टाइलचा फोटो शेअर केला आणि म्हणाली की, कॅन्सर झालेल्यांसाठी मी केस कापले. आलियाच्या लहान बहिणीने तिचे केस कापले. आलियासोबत तिच्या बॉयफ्रेंडनेही केस कापले. बॉयफ्रेंडसोबतचे फोटो आलियाने इन्स्टावर शेअर केले आहेत.
फोटो शेअर करताना आलियाने म्हटलं की, मी आई वडिलांचे आभार मानते कारण त्यांनी मला आत्मविश्वास दिला. तसंच बॉफ्रेंडनंही माझ्यासोबत केस कापले त्याबद्दल त्याचं आभार. माझ्यासोबत ज्यांनी केस कापले आणि लोकांची मदत केली त्या सर्वांच अभार. जर तुम्ही पूर्ण केस काढू शकत नसाल तर ते कापा किंवा रंगवा. सर्वांनी आपआपल्या परीने जनजागृती करण्याचं काम करा आणि दान करून कॅन्सरग्रस्तांना मदत करा असं आवाहनही आलियाने केलं आहे.
मुलीने केस कापल्यानंतर धवनची बायको आयेशानेसुद्धा तिचे फोटो शेअर केले आहेत. तिने लिहिलं की, तु करून दाखवलंस, मला अभिमान आहे की तु माझी मुलगी आहेस. तु नेहमी आनंदी रहावीस. शिखर धवननेसुद्धा मुलीचा फोटो शेअर करत अभिमान वाटत असल्याचं म्हटलं. अलिया धवनने कॅन्सरग्रस्तांसाठी एक डोनेशन फर्म सुरू केली आहे. इथं अनेकांनी पैसे दान करून मदत केली आहे.
हे वाचा : कोरोनाचा IPLला दणका! एका झटक्यात मुंबई इंडियन्सला बसणार हजारो कोटींचा फटका