मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

विराट-रोहित नाही तर, हे दोन क्रिकेटर खिलाडी अक्षय कुमारचे फेवरेट!

विराट-रोहित नाही तर, हे दोन क्रिकेटर खिलाडी अक्षय कुमारचे फेवरेट!

बॉलिवूडचा सुपरस्टार अक्षय कुमार (Akshay Kumar) क्रिकेटवेडा आहे. अनेकवेळा अक्षय कुमार स्टेडियममध्ये जाऊन टीम इंडियाला चीअर करताना दिसतो. अक्षय कुमारला त्याच्या आवडत्या भारतीय खेळाडूंबाबत विचारण्यात आलं.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 13 डिसेंबर : बॉलिवूडचा सुपरस्टार अक्षय कुमार (Akshay Kumar) क्रिकेटवेडा आहे. अनेकवेळा अक्षय कुमार स्टेडियममध्ये जाऊन टीम इंडियाला चीअर करताना दिसतो. अक्षय कुमारला त्याच्या आवडत्या भारतीय खेळाडूंबाबत विचारण्यात आलं, पण त्याने आश्चर्यकारकरित्या विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांची नावं घेतली नाही. आज तकसोबत बोलताना अक्षय कुमारने त्याच्या फेवरेट क्रिकेटपटूंबद्दल सांगितलं.

'सध्या मला केएल राहुल (KL Rahul) आणि शिखर धवन (Shikhar Dhawan) हे दोन खेळाडू आवडतात,' असं अक्षय कुमार म्हणाला आहे. केएल राहुल आता दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर टेस्ट सीरिजसाठी जाणार आहे. तर शिखर धवनला वनडे सीरिजसाठी संधी मिळण्याची शक्यता आहे.

भारतात सुरू असलेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि व्यंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) या दोन्ही खेळाडूंनी धमाकेदार कामगिरी केली आहे, त्यामुळे दक्षिण आफ्रिकेतल्या वनडे सीरिजसाठी या दोघांची निवड निश्चित मानली जात आहे, तर शिखर धवन याची या स्पर्धेतली कामगिरी निराशाजनक झाली आहे, त्यामुळे त्याला डच्चू देण्याचा विचारही निवड समिती करू शकते.

दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी रोहित शर्माला दुखापत झाली आहे, त्यामुळे तो टेस्ट सीरिजमधून बाहेर झाला आहे. रोहितच्या मांडीच्या मांसपेशींना दुखापत झाली आहे, त्यामुळे तो वनडे सीरिजसाठी फिट होणार का नाही याबाबत साशंकता आहे. रोहित शर्मा फिट झाला नाही तर निवड समितीकडे ऋतुराज गायकवाड, पृथ्वी शॉ आणि शिखर धवन हे तीन पर्याय उपलब्ध आहेत.

15 व्या वर्षीच वडिलांचं छत्र हरपलं, आता थेट रोहितऐवजीच टीम इंडियात एण्ट्री!

First published:

Tags: Akshay Kumar, Team india