मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /क्रिकेटवेड्या मुलामुळे वडिलांनी करून घेतली बदली, आईही झाली नाराज; IPL गाजवतोय

क्रिकेटवेड्या मुलामुळे वडिलांनी करून घेतली बदली, आईही झाली नाराज; IPL गाजवतोय

कोण आहे आकाश मढवाल?

कोण आहे आकाश मढवाल?

आकाश मधवालच्या भावाने सांगितलं की, आमचे वडील क्रिकेटमुळे इतके त्रासले की त्यांनी नैनीतालला बदली करून घेतली.

मुंबई, 26 मे : आयपीएलच्या एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावलेल्या आकाश मधवाल याची चर्चा सध्या सगळीकडे होत आहे. आकाशने लखनऊ विरुद्ध जबरदस्त गोलंदाजी केली. त्याने 3.3 षटकात ५ धावा देत ५ विकेट घेतल्या. प्लेऑफमध्ये पाच विकेट घेणारा तो पहिला गोलंदाज ठरला. पण एक काळ असाही होता जेव्हा आकाशच्या क्रिकेट प्रेमासाठी त्याचे वडील घनानंद मधवाल यांनी रुर्कीहून आपली बदली नैनीतालला करून घेतली होती. कारण आकाशच्या क्रिकेट वेडापायी दहावीचे वर्ष वाया घालवू नये असं त्यांना वाटत होतं. त्यानंतर आज बराच काळ गेल्यानंतर क्रिकेटच्या वेडानेच आयपीएलमध्ये आकाशने यशाचं शिखर गाठलंय.

आकाश मधवालने आयपीएलच्या इतिहासात प्लेऑफमध्ये विक्रमी कामगिरीची नोंद केली. त्याने 3.3 षटके टाकताना फक्त पाच धावा दिल्या. यात त्याने पाच विकेट घेतल्या. त्याच्या गोलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने एलिमिनेटर सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सला ८१ धावांनी हरवलं. आता संघ फायनलच्या उंबरठ्यावर आहे.

आकाशचा मोठा भाऊ आशिषने सांगितलं की, आम्हाला दोघांनाही क्रिकेट आवडत होतं पण आकाशचं क्रिकेट वेड जास्त होतं. मी फक्त आनंद मिळवण्यासाठी खेळायचो पण तो क्रिकेटसाठी वेडा होता. आमचे वडील क्रिकेटमुळे इतके त्रासले की त्यांनी नैनीतालला बदली करून घेतली. आमचं अभ्यासावर लक्ष केंद्रीत व्हावं यासाठी त्यांनी असं केलं.

IPL फायनलच्या तिकिटासाठी मारामारी, एकमेकांच्या अंगावर चढले चाहते; VIDEO VIRAL 

आकाशचे वडील लष्करात इंजिनिअर सर्विसेसमध्ये ऑफिसर होते. पण कमी वयातच आकाशचे वडिलांचे छत्र हरपले. यानंतर त्याचे पूर्ण लक्ष अभ्यासात होते. यावेळी त्याने इंजिनिअरिंग पूर्ण केलं आणि रुर्कीतच काम करायला लागला. उत्तराखंडला बीसीसीआयची मान्यता मिळाली तेव्हा डेहराडूनमध्ये ट्रायल्सवेळी त्याच्यावर वसीम जाफऱची नजर पडली.

आकाशला लवकरच वरिष्ठ संघात संधी मिळाली आणि एक वर्षाने त्याला आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने नेट बॉलर म्हणून निवडलं. २०२२ मध्ये त्याला मुंबई इंडियन्सने रिप्लेसमेंट स्कॉडमध्ये घेतलं पण खेळण्याची संधी मिळाली नाही. यंदा त्याचे पदार्पण झाले आणि मुंबईसाठी गेल्या तीन सामन्यात आकाशने कमालीची गोलंदाजी केली.

मुलाच्या यशानंतर त्याच्या आईच्याही डोळ्यात आनंदाश्रू आले. मोठ्या भावाने सांगितलं की, क्रिकेटसाठी आकाशने नोकरी सोडली होती. तेव्हा आई त्याच्या या निर्णयाने थोडी दु:खी झाली होती. मी कापड दुकान चालवायचो. त्याची कमाई कुटुंबासाठी गरजेची होती. पण मला माहिती होतं आकाशला क्रिकेट खेळायचं. आम्ही एक दिवशी घराच्या छतावर बसलो होतो. मी त्याला म्हटलं की तू फक्त क्रिकेट खेळ. बाकीच्या गोष्टी मी पाहीन. तुझं डाएट, बूट, क्रिकेट कीट बघेन. पण तुझं स्वप्न तू सोडणार नाही. त्याने तेच केलं आणि आज त्याचे परिणाम समोर आहेत.

First published:
top videos

    Tags: IPL 2023