बॉलर की रोनाल्डो? क्रिकेटच्या मैदानातला VIDEO शेअर केल्यानंतर आकाश चोप्रा ट्रोल

बॉलर की रोनाल्डो? क्रिकेटच्या मैदानातला VIDEO शेअर केल्यानंतर आकाश चोप्रा ट्रोल

गोलंदाजानं चेंडू अडवल्यानंतर फुटबॉल खेळायला सुरुवात केली. याचा व्हिडिओ शेअर केल्यानंतर आता आकाश चोप्रा पुन्हा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे.

  • Share this:

मुंबई, 17 सप्टेंबर : क्रिकेटचा सामना सुरू असताना अचानक एखादा त्यात फुटबॉल खेळायला लागला तर आश्चर्य वाटेल. एका गोलंदाजानं चेंडू पकडताना थेट फूटबॉल खेळायला सुरुवात केली. याचा व्हिडिओ भारताचा माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्राने शेअर केला आहे. यामध्ये गोलंदाज चेंडू अडवतो आणि पायानं हवेत उडवतो. तो चेंडू जमिनीवर पडू न देता तसाच खेळवत राहतो. शेवटी खांद्यावर घेऊन पायाने उंच उडवतो. तेवढ्या वेळात यष्टीरक्षक धावत येऊन चेंडू झेलतो.

आकाश चोप्राने हा व्हिडिओ शेअर करताना म्हटलं आहे की, हा बॉलर आहे की ख्रिस्तियानो रोनाल्डो. यात रोनाल्डोचं स्पेलिंग लिहताना आकाश चोप्राने Ronald इतकंच लिहलं आहे. त्यामुळं ट्रोलर्सनी निशाणा साधला आहे. याआधी वर्ल्ड कपवेळी त्यांच्या कमेंटमुळं अनेकवेळा ट्रोल झाला होता.

सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असेलेल्या आकाश चोप्राने यापूर्वीही अनेक व्हिडिओ शेअर केले आहेत. पण गोलंदाजानं दाखवलेलं फुटबॉलमधील कौशल्य पाहून तुम्हालाही पुन्हा पुन्हा व्हिडिओ बघावा वाटेल.

हेल्मेटचा जुगाड: हेल्मेट म्हणून चक्क डोक्यावर ठेवलं स्टीलचं पातेलं VIRAL VIDEO

Published by: Suraj Yadav
First published: September 17, 2019, 10:31 AM IST
Tags: cricket

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading