क्रिकेटमध्ये खेळला जातोय ‘अजित पवार’ शॉट, तुम्ही तरी पाहिलात का?

पहिल्यांदाच क्रिकेटमध्ये एका नेत्याच्या नावानं एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 02 डिसेंबर : क्रिकेटमध्ये प्रत्येक खेळाडूची एक वेगळी खेळण्याची पध्दत असते. तसेच, या शॉटना खेळाडूंच्या स्टाईल प्रमाणे नावेही दिली जातात. मात्र पहिल्यांदाच एका राजकारणी नेत्याच्या नावानं एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. महाराष्ट्राच्या राजकीय नाट्यात तुम्ही अजित पवार हे नाव हमखास ऐकले असेल, पण तुम्ही अजित पवार शॉट कधीही पाहिला नसेल.

आयसीसीनं काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ अपलोड केला होता. हा व्हिडीओ होता न्यूझीलंड (New Zealand)मध्ये होत असलेल्या एकदिवसीय फोर्ड ट्रॉफी स्पर्धेचा. या स्पर्धेत ग्लेन फिलिप्स (Glenn Philips) याने आपल्या फलंदाजीनं गोलंदाजीची दाणादाण उडवली. या सामन्यात ऑकलंडच्या ग्लेनने एक अनोखा रिव्हर्स शॉट खेळला. फिलिप्सचा हा अनोखा रिव्हर्स शॉट पाहून विरोधी संघातील खेळाडू आणि प्रेक्षकही थक्क झाले. फिलिप्सनं षटकारासाठी लागवलेला हा शॉट क्रिकेटमध्ये पहिले कधीही पाहायला मिळाला नव्हता की या शॉटची दाखल खुद्द आयसीसीनेही घेतली. आयसीसीने ट्विटरवर फिलिप्सच्या या शॉटचा व्हिडिओ शेअर करत 'या शॉटचे नाव' विचारले.

वाचा-शरद पवारांशी पंगा घेणं ऑस्ट्रेलियाच्या संघालाही पडलंय महागात, पाहा VIDEO

या सामन्यात फिलिप्स आणि मार्टिन गुप्टिल यांच्या आक्रमक खेळीच्या जोरावर ऑकलंडने 50 ओव्हरमध्ये 5 गडी गमावून 310 धावांची मोठी धावसंख्या उभारली. या आव्हानाचा पाठलाग करताना ओटागोचा नील ब्रूम याने 66 धावांची खेळी केली. मात्र एकाही फलंदाजाला विशेष चांगली फलंदाजी करता आली नाही. त्यामुळे संपूर्ण संघ 213 बाद झाला. ऑकलंडने 97 धावांनी विजयाची नोंद केली.

वाचा-VIDEO : त्रिशतकी खेळीनंतर वॉर्नरच्या हेल्मेटवरून भरमैदानात लहान मुलांमध्ये झाला

 

वाचा-अरेरे! लाईव्ह सामन्यात थोडक्यात बचावला स्मिथ, नाही तर घशात गेली असती बत्तीशी

विचार केला एक झालं भलतच

ग्लेनचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या शॉटला विविध नावं देण्यात आली, यात भारतीय चाहत्यांन या शॉटला अजित पवार शॉट असे नाव दिले. ज्याप्रकारे फलंदाज आणि गोलंदाज यांच्यात संघर्ष असतो तसाच महाराष्ट्राच्या राजकारणातही पाहायला मिळाला. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात निकाल लागल्यानंतर महिनाभर कोणत्याच पक्षानं सरकार स्थापन केले नाही. त्यानंतर अचानक 27 नोव्हेंबरला अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी रात्रीत सरकार स्थापनेचा दावा केला आणि सरकार स्थापन झाले. मात्र चारच दिवसात हे सरकार गडगडले. अजित पवार यांनी उप-मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला, त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनीही राजीनामा दिला. या सगळ्या नाट्यानंतर बुधवारी अखेर महाविकासआघाडीच्या वतीनं उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवारांच्या या अजब खेळीमुळे आता क्रिकेटमध्ये त्यांच्या नावाचा एक शॉट आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 2, 2019 01:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading