मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

BCCI: कोण होणार बीसीसीआयचा नवा चीफ सिलेक्टर? मुंबईच्या 'या' माजी खेळाडूचं नाव चर्चेत

BCCI: कोण होणार बीसीसीआयचा नवा चीफ सिलेक्टर? मुंबईच्या 'या' माजी खेळाडूचं नाव चर्चेत

बीसीसीआयचा नवा चीफ सिलेक्टर कोण?

बीसीसीआयचा नवा चीफ सिलेक्टर कोण?

BCCI: नव्या निवड समितीची स्थापना करण्यासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. दरम्यान नव्या निवड समिती अध्यक्षपदासाठी सध्या भारतीय संघाच्या एका माजी खेळाडूचं नाव चर्चेत आहे. हा खेळाडू आहे अजित आगरकर.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Siddhesh Kanase

मुंबई, 19 नोव्हेंबर: टी20 वर्ल्ड कपमधला पराभव बीसीसीआयच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. या पराभवानंतर बीसीसीआयनं मिशन क्लीन टीम इंडिया राबवायला सुरुवात केली आहे. त्याचा पहिलाच धक्का बसला तो निवड समितीला. निवड समिती अध्यक्ष चेतन शर्मांसह चार जणांना तडकाफडची पदावरुन दूर केलं. त्यानंतर लगेचच नव्या निवड समितीची स्थापना करण्यासाठी अर्जही मागवण्यात आले आहेत. दरम्यान नव्या निवड समिती अध्यक्षपदासाठी सध्या भारतीय संघाच्या एका माजी खेळाडूचं नाव चर्चेत आहे. हा खेळाडू आहे अजित आगरकर.

आगरकरचा अनुभव कामी येणार?

अजित आगरकरकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा तगडा अनुभव आहे. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्येही आगरकरनं बरीच वर्ष मुंबईचं प्रतिनिधित्व केलं होतं. निवड समिती अध्यक्षपदासाठी गेल्या वर्षीही आगरकरचं नाव चर्चेत होतं. पण त्यावेळी चेतन शर्मांना संधी देण्यात आली. पण आता आगरकरच्याच नावाला जास्त पसंती मिळण्याची शक्यता आहे.

आयपीएल टीम सोडावी लागणार

निवड समिती अध्यक्ष झाल्यास अजित आगरकरला आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघ सोडावा लागणार आहे. सध्या आगरकर दिल्ली कॅपिटल्सच्या सहाय्यक प्रशिक्षकपदी कार्यरत आहे.

हेही वाचा - Shikhar Dhawan: तू जो मिला... मुलाला पाहताच 'गब्बर' का झाला इतका भावूक? हे आहे कारण...

आगरकरची क्रिकेट कारकीर्द

कसोटी - 26 (58 विकेट्स)

वन डे - 191 (288 विकेट्स)

टी20 - 4 (3 विकेट्स)

IPL - 32 (29 विकेट्स)

फर्स्ट क्लास - 110 (299 विकेट्स)

लिस्ट ए - 270 (420 विकेट्स)

टी20 - 62 (47 विकेट्स)

First published:

Tags: BCCI, Sports, Team india