वर्ल्ड कपमधून डावललेला रहाणे आता ‘या’ संघातून खेळणार

मुंबईकर अजिंक्य रहाणेला वर्ल्ड कपच्या संघातून डावल्यामुळं अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं.

News18 Lokmat | Updated On: Apr 19, 2019 05:07 PM IST

वर्ल्ड कपमधून डावललेला रहाणे आता ‘या’ संघातून खेळणार

मुंबई, 19 एप्रिल: इंग्लंड आणि वेल्समध्ये 30 मे ते 14 जुलै दरम्यान होत असलेल्या वर्ल्ड कप करिता नुकतीच भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. या संघात मुंबईकर अजिंक्य रहाणेला डावल्यामुळं अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं.

रहाणेच्या जागी विजय शंकर याला संघात स्थान देण्यात आलं. त्यामुळं भारताचा कसोटी संघाचा कर्णधार वर्ल्ड कप संघाच्या 15 खेळाडूंच्या चमुतही नाही. त्यामुळं रहाणे नक्कीच निराश झाला आहे.

दरम्यान, अजिंक्य रहाणेनं भारतीय संघात निवड झाली नाही म्हणून कौंटी क्रिकेटमध्ये हॅम्पशायर संघाकडून खेळण्यास उत्सुक आहे. यासंदर्भात रहाणेनं भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (बीसीसीआय) हॅम्पशायर संघाकडून खेळण्याची परवानगी मागितली आहे. मे, जून आणि जुलैच्या मध्यंतरात कौंटी क्रिकेटमध्ये खेळण्याची परवानगी मिळावी म्हणून रहाणेने बीसीसीआयला पत्र पाठवले आहे. शिवाय त्याने एक प्रत सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या प्रशासकीय समितीकडेही पाठवले आहे. आपल्या संघाव्यतिरिक्त कोणत्याही इतर संघात खेळण्याकरिता प्रत्येक खेळाडूला बीसीसीआयची परवानगी घ्यावी लागते.

मे ते जुलै या कालावधीत कौंटी क्रिकेटमध्ये होणाऱ्या चार दिवसांच्या सामन्यात रहाणेला सहभागी व्हायचे आहे. या संदर्भात बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, ''रहाणेला परवानगी न देण्याचा प्रश्नच येत नाही. रहाणे हा वर्ल्ड कप संघाचा सदस्य नाही. त्याला कौंटीत चार दिवसीय सामने खेळायचे आहेत. त्याचा भविष्यातील कसोटी मालिकांत त्याला फायदाच होईल.'' असे सांगितले.

दरम्यान याआधी विराट कोहली आणि चेतेश्वर पुजाला कौंदी क्रिकेटमध्ये खेळले आहेत. त्यामुळं वर्ल्ड कपच्या संघात स्थान मिळत नसले तरी, रहाणेचे स्वत:ला सिद्ध करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

Loading...

वर्ल्ड कप स्पर्धेसाठीचा भारतीय संघ- शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, लोकेश राहुल, दिनेश कार्तिक, विजय शंकर, रवींद्र जडेजा


VIDEO : रावसाहेब दानवे माझी मेहबुबा, खोतकरांची तुफान फटकेबाजी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 19, 2019 05:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...