अजिंक्य रहाणेच्या 'या' मराठमोळ्या गुरुला व्हायचे आहे टीम इंडियाचा कोच!

Team India Coach : वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर भारतीय संघाला नवा प्रशिक्षक मिळण्याची शक्यता आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 29, 2019 05:03 PM IST

अजिंक्य रहाणेच्या 'या' मराठमोळ्या गुरुला व्हायचे आहे टीम इंडियाचा कोच!

ICC Cricket World Cup नंतर भारतीय संघ वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाणार आहे. यानंतर भारतीय संघाला नवा प्रशिक्षक मिळण्याची शक्यता आहे. सध्याचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा करार वेस्ट इंडीज दौऱ्यापर्यंत आहे. मुख्य प्रशिक्षकासह सपोर्ट स्टाफसाठी बीसीसीआयने अर्ज मागवले आहेत.

रवी शास्त्री प्रशिक्षकपदासाठी पुन्हा अर्ज करू शकतात. बीसीसीआयच्या नव्या अटीमध्येसुद्धा शास्त्री बसतात. त्यांचे वय सध्या 57 वर्ष आहे. बीसीसीआयने प्रशिक्षकासाठी कमाल वयाची मर्यादा 60 वर्ष ठेवली आहे.

यात आता भारताचा माजी फलंदाज आणि रणजी कोच प्रवीण आमरे यांनी भारतीय संघाचा प्रशिक्षक होण्याची इच्छा वर्तवली आहे. आमरे यांनी भारतासाठी 11 कसोटी सामने तर, 37 एकदिवसीय सामने खेळले आहेत.

दिवंगत आचरेकर यांच्याकडून क्रिकेटचे धडे घेतलेल्या आमरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईनं रणजी ट्रॉफी जिंकली होती. तसेच अमेरिकेत क्रिकेट रुजवण्यातही त्यांचा मोलाचा वाटा होता.

आमरे यांनी आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचे स्काऊटिंग हेड म्हणून काम केले होते. याच बरोबर भारताचा कसोटी उप-कर्णधार अजिंक्य रहाणेला क्रिकेटचे धडे दिले. त्याचबरोबर सुरेश रैना, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक आणि रॉबीन उथ्थपा यांनाही फलंदाजीची धडे दिले.

Loading...

याआधी भारतीय संघाच्या प्रशिक्षकासाठी विरेंद्र सेहवाग, मोईक हेसन, महेला जयवर्धने, रॉबिन सिंग यांनी भारतीय संघाचा कोच होण्याची इच्छा वर्तवली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 29, 2019 05:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...