त्याचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून त्याला चाहत्यांनी खोचक सल्लादेखील दिला आहे. काहींनी कॅप्शनमधील गाण्याच्या ओळी पूर्ण करत लिहिले की “सोना उगले, उगले हिरे मोती.” तर काहींनी निवृत्तीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.रहाणेला शेतीची आवड असल्याचे नेहमीच पाहायला मिळाले आहे. विशेषतः सेंद्रिय शेती त्याला अधिक आवडते. रहाणे आणि त्याच्या पत्नीता नेहमीच सेंद्रिय शेतीत तयार झालेली फळे आणि भाजीपाला खरेदी करण्याकडे कल असतो. दरम्यान, अजिंक्यच्या कारकिर्दीचा विचार केला, तर तो सध्या भारतासाठी फक्त कसोटी प्रकारात खेळत आहे. खराब प्रदर्शनामुळे कसोटी संघातील त्याची जागाही धोक्यात आली आहे. भारतासाठी मर्यादित षटकांमध्ये त्याला संधी मिळत नसली, तर आयपीएमध्ये मात्र तो खेळतो. मागच्या हंगामात तो दिल्ली कॅपिटल्सचे प्रतिनिधित्व करत होता. आयपीएलमध्ये सुरुवातीच्या दिवसांमध्ये त्याने मुंबई इंडियन्ससोबत कारकिर्दीची सुरुवात केली होती, पण नंतर 2012 मध्ये राजस्थान रॉयल्सने त्याला विकत घेतले. राजस्थान संघासाठी त्याला 2012 मध्ये सर्व 16 सामने खेळण्याची संधी मिळाली होती, ज्यामध्ये त्याने 560 धावा केल्या होत्या. 2016 आणि 2017 मध्ये त्याने रायजिंग पुणे सुपरजायंट्स संघाचे प्रतिनिथित्व केले, त्या दोन वर्षात राजस्थान रॉयल्सवर बंदी घातली गेली होती. 2016 मध्ये त्याने 480 धावा केल्या होत्या. 2018 च्या लिलावात राजस्थानने त्याला पुन्हा एकदा विकत घेतले, पण तो या हंगामात अपेक्षित खेळी करू शकला नाही. दिल्ली कॅपिटल्सने त्याला 2020 मध्ये संघात सामील केले. दिल्लीसाठी त्याने मागच्या दोन हंगामात निराशाजनक प्रदर्शन केले आहे. अशात 2022 च्या मेगा लिलावात त्याला कोणता संघ विकत घेतो? हे उत्सुकतेचे ठरणार आहे.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ajinkya rahane, Cricket, Ipl 2022, Ipl 2022 auction, Sports