मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

मुलींचे बाप असलेले क्रिकेटपटू पत्नींसोबत डिनरला भेटतात तेव्हा...

मुलींचे बाप असलेले क्रिकेटपटू पत्नींसोबत डिनरला भेटतात तेव्हा...

भारताचा क्रिकेटपटू रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांनी पत्नींसह डिनर केला. फोटो शेअर करताना अजिंक्य रहाणेनं तेव्हा काय चर्चा झाली हे सांगितलं आहे.

  • Published by:  Suraj Yadav
मुंबई, 10 जानेवारी : भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्माला लंकेविरुद्धच्या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. वर्ल्ड कपनंतर सलग खेळणाऱ्या रोहित शर्मा सध्या मित्रांसोबत एन्जॉय करत आहे. गुरुवारी त्याने मित्र आणि सहकारी खेळाडू अजिंक्य रहाणेची भेट घेतली. पत्नी रितिकासोबत तो अजिंक्य रहाणेच्या भेटीला गेला होता. अजिंक्य रहाणेनं इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. यामध्ये रितिका, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणेची पत्नी राधिका आणि तो दिसत आहे. याला कॅप्शन देताना रहाणेनं म्हटलं की, 2020 डिनर केला तेव्हा आम्ही आई-वडील होणं आणि मुलींचा सांभाळ कसा करायचा यावर चर्चा केली. अजिंक्य रहाणेची पत्नी राधिकाने गेल्या वर्षी ऑक्टोंबर महिन्यात कन्येला जन्म दिला होता. तर रोहित शर्मा आणि रितिका यांना 2018 मध्ये कन्यारत्न झाले होते. दोघांनी तिचा वाढदिवस मालदिवमध्ये साजरा केला होता. रोहित आणि अजिंक्य यांच्यासारखीच मैत्री रितिका आणि राधिका यांच्यामध्ये आहे. अनेक दौऱ्यांमध्ये दोघी एकत्र दिसतात. पुढच्या महिन्यात न्यूझीलंड ए संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. त्यामधून अजिंक्य रहाणे पुनरागमन करणार आहे. तर न्यूझीलंडचा संघ भारत दौऱ्यावर येईल तेव्हा 21 फेब्रुवारीपासून दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. या सामन्यात रहाणे असेल अशी आशा आहे. तर रोहित शर्मा 14 जानेवारीपासून होत असलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून संघात पुनरागमन करेल. वाचा : फक्त 1 धाव आणि कोहली टाकणार सर्व दिग्गज क्रिकेटपटूंना मागे धोनी लवकरच वन-डे क्रिकेट मधून घेऊ शकतो संन्यास, रवी शास्त्रींचं मोठं विधान
First published:

पुढील बातम्या