Home /News /sport /

अजिंक्यची चिमुकली बाबांच्या Hero ला भेटली तेव्हा...

अजिंक्यची चिमुकली बाबांच्या Hero ला भेटली तेव्हा...

अजिंक्य रहाणे आणि त्याची पत्नी राधिका यांनी काही महिन्यांपूर्वीच तान्हुलीला जन्म दिला. तिचं नाव आर्या आहे.

    मुंबई, 7 जानेवारी : देशवासीयांसाठी खरा Hero असणारा भारताचा आघाडीचा फलंदाज आणि भारकीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे आपल्या तान्हुलीला आर्याला घेऊन त्याच्या Hero ला भेटायला घेऊन गेला. त्याची हीरो कोण आहे ते बघून तुम्हालाही आश्चर्य आणि कौतुक वाटेल. भारतीय संघाचा आघाडीचा फलंदाज आणि आता जबाबदारी असणारा अजिंक्य रहाणे सध्या कुटुंबीयांसमवेत वेळ घालवण्याचा प्राधान्य देत आहे. भारतीय संघ लवकरच न्यूझीलंडच्या दौऱ्यावर रवाना होईल. त्यापूर्वी अजिंक्य आपल्या तान्हुलीला घेऊन आजीला भेटायला गेला. आपल्या आजीबरोबरचे फोटो स्वतः अजिंक्यनेच सोशल मीडियावर शेअर केले आहेत. माझी आजी, My inspiration. My Hero. Time well spent with my family अशा ओळी अजिंक्यने या फॅमिली फोटोंबरोबर लिहिले आहेत. अजिंक्य रहाणे आणि त्याची पत्नी राधिका यांनी काही महिन्यांपूर्वीच तान्हुलीला जन्म दिला. तिचं नाव आर्या आहे. आर्याला घेऊन अजिंक्य पहिल्यांदाच तिच्या पणजीला भेटायला गेला होता. हे भेटीचे क्षण मौल्यवान असल्याचं अजिंक्यनं म्हटलं आहे. लवकरच अजिंक्य न्यूझीलंडला रवाना होईल. अजिंक्यने आपल्या आजीला हीरो म्हटल्यामुळे सोशल मीडियावर त्याचे चाहत्यांनी त्याचं कौतुक केलं आहे. जमिनीवर असलेला खेळाडू, असं म्हणत Twitter यूजर्सनी त्याचं कौतुक केलं आहे. विशेषतः मराठी चाहत्यांनी त्याच्या या कृतीचं तोंडभर कौतुक केलं आहे.
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Ajinkya rahane

    पुढील बातम्या