मुंबई, 07 ऑक्टोबर : भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेची पत्नी राधिकानं 5 ऑक्टोबरला मुलीला जन्म दिला होता. अजिंक्यला कन्यारत्न झाल्याची आनंदाची बातमी भारताचा फिरकीपटू हरभजनसिंगने ट्विटरवरून पहिल्यांदा दिली होती. त्यावेळी अजिंक्य रहाणे दक्षिण आफ्रिका विरोधात पहिला कसोटी सामना खेळत होता. दरम्यान हा सामना भारतानं 203 धावांनी जिंकला. त्यानंतर रहाणे सर्वातआधी मुंबईच्या आपल्या घरी पोहचला आणि बाळाला भेट दिली.
अजिंक्य रहाणे आणि राधिका लहानपणापासून मित्र होते. त्यांनी 26 नोव्हेंबर 2014 रोजी मुंबईत लग्न केलं होतं. अजिंक्य रहाणेनं आपण बाप होणार असल्याची गुड न्यूज जुन महिन्यात दिली होती. त्यानंतर सोमवारी अजिंक्यणं बाळासोबतचा एका फोटो सोशल मीडियावर शेअर केला. दरम्यान रहाणेला आनंदाची बातमी समजली असली तरी तो विशाखापट्टणम इथं कसोटी खेळत आहे. त्यामुळं रहाणेची मुलगी त्याच्यासाठी लकी असल्याची प्रतिक्रिया चाहत्यांनी व्यक्त केली आहे.
Hello ❤️ pic.twitter.com/25oQyXOQeV
— Ajinkya Rahane (@ajinkyarahane88) October 7, 2019
वाचा-धोनीनं क्रिकेट सोडलं? VIRAL VIDEOमुळे चाहत्यांना पुन्हा पडला प्रश्न
याआधी हरभजन सिंगनं सर्वात आधी रहाणेनं मुलीला जन्म दिल्याची बातमी सोशल मीडियावर दिली होती. हरभजननं ट्वीट करत, "नव्या बाबाचे स्वागत आहे. आई आणि छोटी परी व्यवस्थित असतील अशी आशा करतो. तुझ्या आयुष्यातले खुप चांगले क्षण आता सुरू होतील", अशा शुभेच्छा दिल्या होत्या.
Congratulations new daddy in town @ajinkyarahane88 hope Mum and lil princess 👸 are doing well.. fun part of life starts now ajju. #fatherhood
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) October 5, 2019
त्यानंतर सचिन तेंडुलकरनेही "पहिल्या मुलाच्या जन्मान आनंद वेगळा असतो. तुझ्या नाईट वॉचमन रोलसाठी शुभेच्छा", असे मजेशीर ट्वीट केले आहे.
Many Congratulations, Radhika and Ajinkya.
— Sachin Tendulkar (@sachin_rt) October 7, 2019
The joy of being parents to your first child is unparalleled. Soak it in! Enjoy playing the new role of a night watchman changing the diapers. 😉 https://t.co/mquFXkyCDo
वाचा-फलंदाजाला बोल्ड झाल्याचं कळालच नाही, पाहा शमीचा तुफानी इनस्विंग
मुलीचा बाप होणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंच्या यादीत आता अजिंक्य रहाणेच्या नावाची भर पडली आहे. याआधी भारतीय क्रिकेटपटूंमध्ये धोनी, हरभजन सिंग, सुरेश रैना, रोहित शर्मा आणि हनुमा विहारी या खेळाडूंनादेखील मुलगी झाली आहे.
वाचा-विमान नाही, पक्षी नाही; हा तर निघाला सर जडेजा! अफलातून कॅचचा VIDEO
VIDEO : अंगावर रोमांच उभी करणारी तलवारबाजीची थरारक प्रात्याक्षिकं
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा