IND vs AUS : ना धोनी, ना विराट, ना दादा! फक्त 'अजिंक्य'च

IND vs AUS : ना धोनी, ना विराट, ना दादा! फक्त 'अजिंक्य'च

India Vs Australia: सीरिजआधी अफगाणिस्तानविरुद्ध बंगळुरू टेस्टमध्ये आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध धर्मशालामध्येच भारताने विजय मिळवला होता.

  • Share this:

ब्रिस्बेन, 19 जानेवारी : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ब्रिस्बेन टेस्टमध्ये भारताने रोमांचक विजय मिळवला आहे. याचसोबत भारताने बॉर्डर-गावसकर ट्रॉफीवर पुन्हा एकदा नाव कोरलं आहे. लागोपाठ दुसऱ्यांदा भारताने ऑस्ट्रेलियाचा त्यांच्याच मायभूमीत पराभव केला आहे. मागच्यावेळी विराट कोहलीच्या नेतृत्वात तर यंदा अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात भारताने विजय संपादन केला.

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली पितृत्वाच्या रजेवर गेल्यामुळे पहिली टेस्ट संपल्यानंतर भारतात परतला. विराटच्या नेतृत्वात झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये भारताचा मानहानीकारक पराभव झाला. या मॅचमध्ये भारतीय टीम फक्त 36 रनवरच ऑल आऊट झाली, पण या पराभवानंतर रहाणेकडे टीमची सूत्र आली आणि मग त्याने मागे वळून पाहिलं नाही. मेलबर्नच्या बॉक्सिंग टेस्टमध्ये भारताने विजय मिळवला, यानंतर सिडनीची टेस्ट ड्रॉ करण्यात भारताला यश आलं, तर ब्रिस्बेनमध्ये भारताने पुन्हा एकदा विजय मिळवत सीरिज खिशात टाकली.

अजिंक्य रहाणेने आतापर्यंत 5 मॅचमध्ये भारताचं नेतृत्व केलं आहे. यातल्या एकाही टेस्टमध्ये भारताचा पराभव झालेला नाही. या सीरिजआधी अफगाणिस्तानविरुद्ध बंगळुरू टेस्टमध्ये आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध धर्मशालामध्येच भारताने विजय मिळवला होता.

Published by: Manoj Khandekar
First published: January 19, 2021, 2:47 PM IST

ताज्या बातम्या