मुंबई, 1 मे : देशभरामध्ये कोरोना व्हायरसने (Corona Virus) थैमान घातलं आहे. गेल्या काही काळापासून दिवसाला कोरोनाचे तीन लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत, तसंच रोज अडीच हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू होत आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालल्यामुळे ऑक्सिजन सिलेंडरचीही कमतरता जाणवत आहे, त्यामुळे अनेक भारतीय तसंच परदेशी क्रिकेटपटूंनीही मदतीचा हात पुढे केला आहे. ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर पॅट कमिन्सने (Pat Cummins) पीएम केयर फंडमध्ये 37 लाख रुपयांची तर ब्रेट लीने (Brett Lee) एक बिटकॉईन म्हणजेच जवळपास 42 लाख रुपये दिले.
शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि जयदेव उनाडकट (Jaydev Unadkat) यांनीही त्यांच्या आयपीएल मानधनातली काही रक्कम कोरोनाविरोधातल्या लढाईसाठी दान करण्याचा निर्णय घेतला आहे. सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) ऑक्सिजन कॉनसनट्रेटरसाठी 1 कोटी रुपयांचा निधी दिला आहे.
आता अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) महाराष्ट्राच्या मदतीला धावला आहे. अजिंक्यने मिशन वायूसाठी 30 ऑक्सिजन कॉनसनट्रेटर दिले आहेत. एमसीसीआयए म्हणजेच महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ऍण्ड ऍग्रिकल्चरच्या मिशन वायू मोहिमेला पाठिंबा म्हणून रहाणेने ही मदत केली आहे. अजिंक्यने दिलेले हे 30 ऑक्सिजन कॉनसनट्रेटर महाराष्ट्रात जिकडे कोरोनाचा कहर जास्त आहे, अशा जिल्ह्यांमध्ये पाठवले जाणार आहेत.
Thank you so much Ajinkya Rahane @ajinkyarahane88 for your additional contribution of 30 Oxygen Concentrators to #MissionVayu. We will send these to the most affected districts of Maharashtra.@AUThackeray @ppcr_pune @sudhirmehtapune @Girbane @vikramsathaye @sunandanlele
— MCCIA (@MCCIA_Pune) May 1, 2021
आयपीएलच्या (IPL 2021) यंदाच्या मोसमात रहाणे दिल्ली कॅपिटल्सच्या (Delhi Capitals) टीममध्ये आहे, पण त्याला खेळण्याची फार संधी मिळाली नाही. दोन सामन्यांपैकी चेन्नईविरुद्ध रहाणे बॅटिंगलाच उतरला नाही, तर राजस्थानविरुद्ध तो 1 रन करून आऊट झाला.
आयपीएलच्या 151 सामन्यांमध्ये रहाणेने 31.53 ची सरासरी आणि 121.34 च्या स्ट्राईक रेटने 4 हजारापेक्षा जास्त रन केले आहेत. यात 2 शतकं आणि 28 अर्धशतकांचा समावेश आहे. आयपीएलच्या या मोसमात दिल्लीने 7 पैकी 5 सामने जिंकले आहेत. पॉईंट्स टेबलमध्ये ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत. दिल्लीचा पुढचा सामना पंजाब किंग्सविरुद्ध 2 मे रोजी होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ajinkya rahane, Coronavirus, Cricket