मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /अजिंक्य रहाणेच्या आजीचं निधन, शेवटची इच्छा अपूर्णच राहिली

अजिंक्य रहाणेच्या आजीचं निधन, शेवटची इच्छा अपूर्णच राहिली

भारतीय टेस्ट टीमचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) घरात दु:खद घटना घडली आहे. अजिंक्य रहाणेची आजी झेलूबाई बाबूराव रहाणे यांचं निधन झालं आहे.

मुंबई, 6 एप्रिल : भारतीय टेस्ट टीमचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) घरात दु:खद घटना घडली आहे. अजिंक्य रहाणेची आजी झेलूबाई बाबूराव रहाणे यांचं निधन झालं आहे. अजिंक्य रहाणे हा त्याच्या आजीबद्दल भावुक होता. अनेकवेळा सोशल मीडियावर तो आजीसोबतचे फोटो शेयर करायचा. काहीच दिवसांपूर्वी अजिंक्य रहाणेने संगमनेरला जाऊन आजीला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. कोरोनाचं संकट कमी झाल्यानंतर आपण संगमनेरला जाऊन आजीला भेटणार असल्याचं अजिंक्य म्हणाला होता, पण त्याची ही इच्छा अपूर्णच राहिली.

अजिंक्य रहाणेच्या आजीच्या निधनाबद्दल त्याचे वडील मधुकर रहाणे यांनी सांगितलं. कोरोना व्हायरसमुळे आम्ही घरातूनच तिला श्रद्धांजली दिल्याचं अजिंक्यचे वडील म्हणाले.

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात भारताने ऑस्ट्रेलियात (India vs Australia) ऐतिहासिक कामगिरी करत टेस्ट सीरिजमध्ये 2-1 ने विजय मिळवला होता. मेलबर्न टेस्टमध्ये रहाणेने धडाकेबाज शतक केलं होतं. ऑस्ट्रेलियातल्या ऐतिहासिक कामगिरी केल्यानंतर अजिंक्य रहाणेच्या गावात फटाके फोडून जल्लोष करण्यात आला होता.

आयपीएलच्या 14 व्या मोसमात (IPL 2021) खेळण्यासाठी अजिंक्य रहाणे सध्या बायो-बबलमध्ये आहे. दिल्ली कॅपिटल्सकडून (Delhi Capitals) खेळणारा अजिंक्य रहाणे टीमसोबत सरावही करत आहे. दिल्लीचा पहिला मुकाबला 10 एप्रिलला चेन्नई सुपरकिंग्सविरुद्ध मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.

First published:

Tags: Ajinkya rahane, Cricket news