IPL 2019 : ...म्हणून अजिंक्य रहाणेलाही लाखोंचा भुर्दंड

आयपीएलच्या बाराव्या हंगामात राजस्थान रॉयल्सचा संघाला सलग तीन सामन्यात पराभव पत्करावा लागला. त्यामुळं या संघावर आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 1, 2019 01:29 PM IST

IPL 2019 : ...म्हणून अजिंक्य रहाणेलाही लाखोंचा भुर्दंड

चेन्नई, 1 एप्रिल : आयपीएलच्या बाराव्या हंगामात सलग तीन सामन्यात पराभव पत्करावा लागल्यामुळं राजस्थान रॉयल्सचा संघ सध्या आत्मचिंतन करण्याची वेळ आहे. चेन्नई विरुद्धच्या सामन्यात सलग तिसऱ्यादा हाता तोंडाशी आलेला घास राजस्थानला गमवावा लागला. यातच आता राजस्थानला डबल दणका बसला आहे.

चेन्नई विरुद्धच्या सामन्यात संथ गतीनं षटके टाकल्याबद्दल त्याला दंड करण्यात आला आहे. यंदाच्या हंगामातील राजस्थान हा दुसरा संघ आहे. याआधी मुंबई संघाला दंड ठोठावण्यात आला होता.

एकीकडे राजस्थान पहिल्या विजयाच्या शोधात आहे तर, सलग तीन सामने जिंकत आपली विजय घौडदौड चेन्नईनं कायम राखली आहे. अटीतटीच्या सामन्यात चेन्नईने राजस्थानचा 8 धावांनी पराभव केला. यात सर्व श्रेय कर्णधार महेंद्रसिंग धोनीला जातं. चेपॉकवर राजस्थान विरोधात हल्लाबोल करत धोनीनं चेन्नईला सावरले. आतापर्यंत राजस्थानला एकही सामना जिंकता न आल्यामुळे ते गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आहेत. मात्र चेन्नईने आयपीएलच्या १२ व्या हंगामात आपली विजयी परंपरा कायम राखत, घरच्या मैदानावर खेळत अटीतटीच्या सामन्यात राजस्थानचा पराभव केला.अखेरच्या षटकात विजयासाठी १२ धावांची गरज असताना ब्राव्होने राजस्थानच्या प्रयत्नांवर पाणी फिरवत चेन्नईला विजय मिळवून दिला. विशेष म्हणजे घरच्या मैदानावर चेन्नई एकही सामना हरलेली नाही.१७६ धावांचा पाठलाग करताना पहिल्या चेंडूपासून राजस्थानची सुरुवात खराब झाली. एकही धाव न घेता राजस्थानचा कर्णधार अजिंक्य रहाणे शुन्यावर बाद झाला. त्रिपाठी आणि स्टिव्ह स्मिथ या मधल्या फळीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. तर आर्चर-स्टोक्स या जोडीने राजस्थानचा हा विजय जवळपास निश्चित केला होता. मात्र अखेरच्या षटकात स्टोक्स बाद झाल्याने राजस्थानच्या विजयाच्या आशा धुसर झाल्या. मोक्याच्याक्षणी ब्राव्होने आपल्या अनुभव पणाला लावत संघाला विजय मिळवून दिला.


VIDEO: 'इस्रो'ने पुन्हा रचला इतिहास, एमिसॅट्सह 28 उपग्रहांनी अशी घेतली भरारी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 1, 2019 01:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...