IPL 2020 : अजिंक्य रहाणेला 'या' संघाकडून मिळाली ऑफर, सोडणार राजस्थान रॉयल्सची साथ?

2011पासून राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा राहणार सोडणार संघाची साथ.

News18 Lokmat | Updated On: Aug 12, 2019 06:46 PM IST

IPL 2020 : अजिंक्य रहाणेला 'या' संघाकडून मिळाली ऑफर, सोडणार राजस्थान रॉयल्सची साथ?

मुंबई, 12 ऑगस्ट : भारताचा आघाडीचा फलंदाज आणि आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणेनं एक मोठा निर्णय घेतला आहे. आयपीएल 2020मध्ये रहाणे राजस्थान रॉयल्स संघाकडून नाही तर वेगळ्या संघाकडून मैदानात उतरू शकतो. मीडिया रिपोर्ट्स नुसार, दिल्ली कॅपिटल्सचा संघ अजिंक्य रहाणेला आपल्या संघात सामिल करून घेण्यासाठी उत्सुक आहे. यासंबंधी त्यांनी राजस्थान संघाच्या आयोजकांशी चर्चा केली हे. त्यामुळं पुढच्या हंगामात रहाणे दिल्लीकडून खेळताना दिसू शकतो.

मीडिया रिपोर्ट्स नुसार, राजस्थान आणि दिल्ली या दोन्ही संघांची चर्चा सुरु आहे. आयपीएलच्या 11व्या हंगामात राजस्थान संघाला तळाच्या संघांमध्ये होता, त्यामुळं स्पर्धेच्यामध्येच रहाणेला कर्णधारपदावरून हटवण्यात आले. रहाणेच्या जागी स्टिव्ह स्मिथकडे कर्णधारपद देण्यात आले.

रहाणे 2008 आणि 2009मध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळला होता. 2010मध्ये रहाणे आयपीएल खेळू शकला नव्हता, त्यानंतर 2011मध्ये पुन्हा रहाणे राजस्थानसोबत जोडला गेला. दोन वर्ष राजस्थानच्या संघावर बंदी घालण्यात आल्यामुळं रहाणे पुणे सुपरजायंट्स संघाकडून खेळला होता. मात्र, रहाणे आता राजस्थानची साथ सोडणार असे चित्र दिसत आहे.

वाचा-लग्नाआधी बहिणीनं शोधली दीपक चहरची मुलगी! VIDEO VIRAL

दिल्ली संघात रहाणेला मिळणार का कर्णधारपद?

Loading...

दिल्ली कॅपिटल्स संघाचे कर्णधारपद युवा खेळाडू श्रेयस अय्यरकडे आहे. श्रेयस सर्वात युवा कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली दिल्ली संघानं प्ले ऑफपर्यंत मजल मारली होती. त्यामुळं रहाणे दिल्ली संघात आल्यास त्याला कर्णधारपद मिळण्याची शक्यता कमी आहे.

वाचा-आमच्याशी नडायचं नाही, विराटनं दिला 'हा' इशारा!

धवन पाठोपाठ रहाणेलाही होणार फायदा

मागच्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणाऱ्या धवननं जबरदस्त फलंदाजी केली होती. 11व्या हंगामात त्यानं 521 धावा केल्या होत्या. त्याचबरोबर त्याची निवड वर्ल्ड कप संघातही करण्यात आली होती. त्यामुळं रहाणेनं चांगली कामगिरी केल्यास ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये रहाणेला संघात स्थान मिळू शकते.

वाचा-ऋषभ पंतचे स्थान धोक्यात? गावसकर यांनी सांगितला चौथ्या क्रमांकाचा दावेदार

'तो' पाठीमागून आला आणि 5 वेळा घातले डोक्यात फावडे, हत्येच्या घटनेचा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 12, 2019 05:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...