मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

रहाणेच्या पत्नीने केली टीकाकारांची बोलती बंद, करून दिली ती आठवण

रहाणेच्या पत्नीने केली टीकाकारांची बोलती बंद, करून दिली ती आठवण

रहाणेच्या बायकोने दिलं टीकाकारांना प्रत्युत्तर

रहाणेच्या बायकोने दिलं टीकाकारांना प्रत्युत्तर

भारतीय टीम सध्या इंग्लंडमध्ये 5 टेस्ट मॅचची सीरिज खेळत आहे, पण टीमचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेवर (Ajinkya Rahane) खराब फॉर्ममुळे टीका होत आहे. त्यातच आता रहाणेची पत्नी राधिका धोपावकरने (Radhika Dhopavkar) इन्स्टाग्रामवर भावुक पोस्ट शेयर केली आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

मुंबई, 31 ऑगस्ट : भारतीय टीम सध्या इंग्लंडमध्ये 5 टेस्ट मॅचची सीरिज खेळत आहे, पण टीमचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेवर (Ajinkya Rahane) खराब फॉर्ममुळे टीका होत आहे. रहाणेने या सीरिजमध्ये 3 टेस्टच्या 5 इनिंगमध्ये फक्त 95 रन केले आहेत. अनेकांनी तर रहाणेला टीमबाहेर करण्याची मागणी केली आहे. त्यातच आता रहाणेची पत्नी राधिका धोपावकरने (Radhika Dhopavkar) इन्स्टाग्रामवर भावुक पोस्ट शेयर केली आहे. अजिंक्यच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाला 10 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्याबद्दल राधिकाने ही पोस्ट लिहिली आहे, पण तिने इशाऱ्या इशाऱ्यांमधूनच रहाणेच्या टीकाकारांना प्रत्युत्तर दिलं आहे.

'10 वर्षांचा हा काळ कसा गेला, कळलंच नाही. पहाटे 5 वाजताचा मुंबई लोकल ट्रेनचा प्रवास, स्थानिक क्रिकेटमध्ये अनेक वर्षांची मेहनत आणि मग आपली पहिली आंतरराष्ट्रीय कॅप मिळवण्यासाठी पाहिलेली वाट, यासाठी तू खूप वाट पाहिलीस अजिंक्य. तू खूप चढ-उतार बघितलेस. तुझं सगळ्या अडचणींविरोधात लढण्याचं साहस तसंच आहे. तू या प्रवासात प्रत्येक दिवशी आमची मान उंचावलीस. तुझ्यासोबत आता आणि कायमच उभी राहून मी खूश आहे,' असं राधिका तिच्या पोस्टमध्ये म्हणाली.

अजिंक्य रहाणेने इंग्लंडविरुद्ध आजच्याच दिवशी म्हणजे 31 ऑगस्ट 2011 साली आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं होतं. इंग्लंडविरुद्ध मॅनचेस्टरमध्ये झालेल्या टी-20 मॅचमध्ये रहाणे ओपनिंगला उतरला होता. आपल्या पहिल्याच सामन्यात रहाणेने अर्धशतक झळकावलं होतं. या सामन्यात भारताचा पराभव झाला होता, पण रहाणेने सगळ्यांना प्रभावित केलं होतं.

या मॅचच्या तीन दिवसानंतर लगेच रहाणेने इंग्लंडविरुद्ध वनडेमध्येही पदार्पण केलं होतं आणि 40 रनची खेळी केली होती. पावसामुळे हा सामना पूर्ण होऊ शकला नाही. यानंतर 2 वर्षांनी रहाणेला टेस्टमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली.

भारतीय टेस्ट टीमचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 वर्ष पूर्ण झाली आहेत. मागच्या एका वर्षापासून रहाणेची बॅट शांत आहे. मागच्या एका वर्षात रहाणेने 12 मॅचमध्ये 26.95 च्या सरासरीने 539 रन केले, यामध्ये फक्त एका शतकाचा समावेश आहे. सध्या सुरू असलेल्या इंग्लंड दौऱ्यातही रहाणे संघर्ष करत आहे.

2007-08 साली रहाणेने मॉन्टी पनेसार, लियाम प्लंकेट यांच्यासारखे खेळाडू असणाऱ्या इंग्लंड लायन्सच्या टीमविरुद्ध 172 रनची खेळी केली होती. तेव्हापासून अजिंक्य रहाणेबद्दल मोठ्या प्रमाणावर बोललं जाऊ लागलं. 2009-10 आणि 2010-11 च्या मोसमात स्थानिक क्रिकेटमध्ये रहाणेने भरपूर रन केले. या दोन मोसमात त्याने 3-3 शतकं केली. ऑस्ट्रेलियात इमर्जिंग प्लेयर्स स्पर्धेतही रहाणने 2 शतकं झळकावली. या कामगिरीमुळे त्याची 2011 सालच्या इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या वनडे टीममध्ये निवड झाली.

2 वर्षांनी 2013 साली रहाणेने टेस्टमध्ये पदार्पण केलं. यानंतर त्याने मागे वळून बघितलं नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध डरबन टेस्टच्या दोन्ही इनिंगमध्ये रहाणने अर्धशतकं केली. यानंतर न्यूझीलंडविरुद्ध वेलिंग्टनमध्ये रहाणेने टेस्टमधलं आपलं पहिलं शतक केलं. ही मॅच ड्रॉ झाली होती. 2014 साली इंग्लंड दौऱ्यासाठी रहाणेची निवड झाली. लॉर्ड्स टेस्टमध्ये त्याने 103 रनची खेळी केली आणि भारताला विजय मिळवून दिला. यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही त्याने आपला फॉर्म कायम ठेवला. एडलेड आणि ब्रिस्बनमध्ये अर्धशतक आणि मेलबर्नमध्ये त्याने 147 रन केले.

रहाणेच्या नेतृत्वात भारताने 5 पैकी 4 मॅच जिंकल्या आणि एक मॅच ड्रॉ झाली. मागच्यावर्षी विराट कोहली पितृत्वाच्या रजेसाठी भारतात परतल्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यात रहाणेकडे टीम इंडियाचं नेतृत्व देण्यात आलं. यानंतर टीमने ऑस्ट्रेलियात सीरिज जिंकण्याचा भीष्मपराक्रम केला.

First published:

Tags: Ajinkya rahane, India vs england