अजिंक्य रहाणे झाला बापमाणूस, हरभजनने केलं अभिनंदन

भारताचा क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेच्या पत्नीने मुलीला जन्म दिला असून ही बातमी फिरकीपटू हरभजनसिंगने ट्विटरवरून दिली आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 5, 2019 11:16 AM IST

अजिंक्य रहाणे झाला बापमाणूस, हरभजनने केलं अभिनंदन

मुंबई, 05 ऑक्टोबर : भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेची पत्नी राधिकाने मुलीला जन्म दिला आहे. अजिंक्यला कन्यारत्न झाल्याची आनंदाची बातमी भारताचा फिरकीपटू हरभजनसिंगने ट्विटरवरून दिली आहे. अजिंक्य रहाणे सध्या विशाखापट्टणन इथं आहे.

अजिंक्य रहाणे आणि राधिका लहानपणापासून मित्र होते. त्यांनी 26 नोव्हेंबर 2014 रोजी मुंबईत लग्न केलं होतं. अजिंक्य रहाणेनं आपण बाप होणार असल्याची गुड न्यूज जुन महिन्यात दिली होती. त्याने सोशल मीडियावर काही फोटो शेअऱ केले होते.

मुलीचा बाप होणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंच्या यादीत आता अजिंक्य रहाणेच्या नावाची भर पडली आहे. याआधी भारतीय क्रिकेटपटूंमध्ये धोनी, हरभजन सिंग, सुरेश रैना, रोहित शर्मा आणि हनुमा विहारी या खेळाडूंनादेखील मुलगी झाली आहे.

रहाणेला आनंदाची बातमी समजली असली तरी तो विशाखापट्टणम इथं कसोटी खेळत आहे. भारतानं पहिल्या डावात 7 बाद 502 धावांवर डाव घोषित केला होता. त्यानंतर दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेला पहिल्या डावात 431 धावांपर्यंत मजल मारता आली. भारत दुसऱ्या डावात फलंदाजीला उतरला असून 7 षटकांत बिनबाद 16 धावा झाल्या असून 87 धावांची आघाडी घेतली आहे.

Loading...

VIDEO : तावडेंना आता कळलं असेल, यादीत नाव नसलं की कसं वाटतं? एकच सोशलकल्लोळ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 5, 2019 11:16 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...