'अरे पुढच्यावेळी तुलाही घेऊन जातो', मराठमोळ्या अंदाजात अजिंक्यनं घेतली रोहितची फिरकी

'अरे पुढच्यावेळी तुलाही घेऊन जातो', मराठमोळ्या अंदाजात अजिंक्यनं घेतली रोहितची फिरकी

रोहित-अजिंक्यमध्ये चक्क मराठीत रंगला संवाद.

  • Share this:

मुंबई, 1 नोव्हेंबर : भारतीय संघ चांगल्या फॉर्ममध्ये आहे. वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांना क्लिन स्विप दिल्यानंतर आता भारतीय संघाचे लक्ष बांगलादेशवर आहे. एकीकडे रोहित शर्माकडे टी-20चे नेतृत्व देण्यात आले आहे. बांगलादेश दौऱ्यात विराट कोहलीला विश्रांती दिल्यानंतर रोहित शर्माला कर्णधारपद केले. भारत-बांगलादेश यांच्यात तीन टी-20 सामन्यांची मालिका 3 नोव्हेंबरपासून होत आहे.

दुसरीकडे अजिंक्य रहाणेला टी-20 संघात जागा मिळालेली नाही आहे. त्यामुळं नुकत्याच एका लहान मुलीचा बाबा झालेला रहाणे आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. एवढेच नाही तर रहाणेनं दिवाळीनिमित्त आपल्या लहानग्या मुलीसाठी भरपूर खरेदी केली. शॉपिंगदरम्यानचा एक फोटो अजिंक्यने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला.

 

View this post on Instagram

 

Diwali shopping with @radhika_dhopavkar! Special shopping this time for the special one at home! ‍‍

A post shared by Ajinkya Rahane (@ajinkyarahane) on

अजिंक्यनं टाकलेल्या या फोटोवर त्याचा मुंबईकर साथिदार रोहित शर्मानं भन्नाट कमेंट केला. या पोस्टवर रोहितनं, शॉपिंग करायला गेला आहेस की जेवण करायला?? मला पाठीमागे बुफे दिसतोय, अशी कमेंट केली.

रोहितच्या या कमेंटला अजिंक्यनं मराठमोळ्या अंदाजात उत्तर दिले. राहणेनं, “अरे आधी शॉपिंग मग जेवण. पुढच्यावेळी तुलाही घेऊन जातो”, असेही म्हणत नेटकऱ्यांची मनं जिंकली.

दरम्यान, तीन नोव्हेंबरपासून बांगलादेश दौऱ्याला सुरुवात होणार असून यात तीन टी-20 आणि 2 कसोटी सामनेही खेळवण्यात येणार आहेत. यातील पहिला कसोटी सामना डे-नाईट खेळला जाणार आहे. रोहित शर्माकडे टी-20चे कर्णधारपद तर अजिंक्यकडे कसोटी संघाचे उप-कर्णधारपद असणार आहे.

VIDEO: निसर्गाची अवकृपा शेतकऱ्यांचा आक्रोश पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

Published by: Priyanka Gawde
First published: November 1, 2019, 6:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading