देशाला सुवर्णपदक जिंकून दिलं पण आता शोधतोय नोकरी

आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलेला खेळाडू त्याचा खर्च भागवण्यासाठी नोकरीच्या शोधात आहे. नोकरी नसल्याने खर्चासाठी वडिलांकडून पैसे मागावे लागत असल्याचं दु:ख त्याने व्यक्त केलं.

News18 Lokmat | Updated On: Oct 26, 2019 11:15 AM IST

देशाला सुवर्णपदक जिंकून दिलं पण आता शोधतोय नोकरी

सोनीपत, 26 ऑक्टोबर : थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये सुरु असलेल्या आशियाई पॅरा आर्चरी चॅम्पियनशिप स्पर्धेत गुरुवारी भारताचा विवेक चिकाराने सुवर्णपदक पटकावलं. पुरुषांच्या रीकर्व ओपन इव्हेंटमध्ये चिकाराने 7-1 अशा फरकाने चीनच्या सिजान वांगला पराभूत केलं आणि सुवर्णपदकावर नाव कोरलं.

दर दोन वर्षांनी ही स्पर्धा होते. भारतीय संघाने मलेशियाच्या संघाला 6-2 ने पराभूत केलं. यासह भारताने कांस्यपदक पटकावलं. या संघात हरविद्र सिंग, विवेक चिकारा आणि राजेश कुमार यांचा समावेश होता.

एमबीए झालेला विवेक चिकारा एका खासगी कंपनीत काम करत होता. दोन वर्षांपूर्वी एका अपघातात त्याला पाय गमवावा लागला आणि नोकरीही सुटली. त्यानंतर वडिलांनी त्याला मेरठमधील गुरुकुलमध्ये दाखल केलं. त्याला प्रशिक्षक सत्यदेव यांनी साथ दिली.

2004 चे ऑलिम्पियन आणि ध्यानचंद पुरस्कार विजेते प्रशिक्षक सत्यदेव म्हणतात की, मी जिथंही गेलो तिथं विवेक त्यांच्यासोबत होता. दिल्ली आलो तर विवेक तिथं पोहचला आता सोनीपतला गेलो तर तिथही भाड्यानं घर घेऊन राहिला. बँकॉकमधील हे त्याचं पहिलं आंतरराष्ट्रीय पदक आहे.

विवेक चिकाराने सांगितलं की, ज्यावेळी आर्चरीच्या प्रॅक्टिसाठी कंपनीकडे वेळ मागितली तेव्हा ओव्हर टाइम करावा लागेल असं उत्तर मिळालं. त्यानंतर नोकरी सोडली. त्याआधी मी घरच्यांना पैसे पाठवायचो पण आता वडिलांकडून पैसे घ्यावे लागतात. याचं खुप वाईट वाटतं पण नोकरी मिळेपर्यंत काही पर्याय नाही असंही विवेकने म्हटलं.

Loading...

video: ... तर सचिन कधी क्रिकेट खेळू शकला नसता; स्वत: केला मोठा खुलासा!

SPECIAL REPORT: सत्तेसाठी पक्षांतर करणाऱ्या 'या' नेत्यांना मतदारांनी दाखवला घरचा रस्ता

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 26, 2019 11:15 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...