Ashes : आर्चरच्या तडाख्यात कांगारूंची भंबेरी, 43 धावांत गमावले 8 गडी

Ashes : आर्चरच्या तडाख्यात कांगारूंची भंबेरी, 43 धावांत गमावले 8 गडी

अॅशेस मालिकेतील तिसऱ्या स्टीव्ह स्मिथच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 179 धावांवर संपुष्टात आला.

  • Share this:

लीड्स, 23 ऑगस्ट : ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथ तिसऱ्या कसोटी सामन्यात नसल्यानं इंग्लंडला मालिकेत पुनरागमन करण्याची संधी आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्याच दिवशी स्मिथ नसल्याचा फायदा इंग्लंडला झाला. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव फक्त 179 धावांवर संपुष्टात आला. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरच्या भेदक माऱ्यासमोर वॉर्नर आणि लाबुशेन वगळता कोणीही टिकू शकलं नाही. दुसऱ्या कसोटीत स्टीव्ह स्मिथच्या मानेवर आर्चरचा बाऊन्सर आदळला होता. त्यानंतर स्मिथ दुसऱ्या डावात खेळू शकला नव्हता.

जोफ्रा आर्चरनं सुरुवातीपासूनच ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर भेदक मारा सुरु केला. त्यानं मार्कस हॅरिसला बाद करून पहिला दणका दिला. त्यानंतर उस्मान ख्वाजा, स्टुअर्ट ब्रॉड बाद झेलबाद झाले. वॉर्नर आणि लाबुशेननं पडझड थांबवत ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. वॉर्नरने 94 चेंडूत 61 धावांची खेळी केली. यात त्यानं 7 चौकारही मारले.

वॉर्नर बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांची घसरगुंडी उडाली. ट्रेविस हेड आणि मॅथ्यू वेड यांना खातंही उघडता आलं नाही. तर कर्णधार टिम पेन फक्त 11 धावा काढून बाद झाला. त्यानंतर पेंटिन्सन आणि कमिन्सला जोफ्रा आर्चरनं बाद केलं. लाबुशेननं 74 धावा केल्या. त्याला बेन स्टोक्सनं बाद केलं. त्यानंतर आर्चरने नाथन लायनला बाद करून ऑस्ट्रेलियाचा डाव संपुष्टात आणला.

ऑस्ट्रेलियानं पहिले दोन गडी 25 धावांत गमावले होते. त्यानंतर लाबुशेन आणि वॉर्नर यांनी 111 धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाच्या 2 बाद 136 धावा होत्या तेव्हाच वॉर्नर बाद झाला आणि नंतर 43 धावांत त्यांचा उर्वरीत संघ गुंडाळला. आर्चरनं त्याच्या दुसऱ्याच कसोटीत 6 गडी बाद करत कांगारुंची झोप उडवली.

सीबीआयने पी. चिदंबरम यांना विचारले 'हे' 20 प्रश्न, पाहा SPECIAL REPORT

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 23, 2019 08:17 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading