Home /News /sport /

INDvsPAK महामुकाबला! पाकिस्तानचा माजी कर्णधार म्हणतो, 'हा' संघ जिंकण्याची अधिक शक्यता

INDvsPAK महामुकाबला! पाकिस्तानचा माजी कर्णधार म्हणतो, 'हा' संघ जिंकण्याची अधिक शक्यता

INDvsPAk मॅचपूर्वी पाकिस्तानच्या 'या' खेळाडूचे मोठे विधान

INDvsPAk मॅचपूर्वी पाकिस्तानच्या 'या' खेळाडूचे मोठे विधान

टी-20 वर्ल्डकपमधील(T20 World Cup 2021) सर्वात प्रमुख दावेदारांबद्दल बोलायचे तर जागतिक क्रिकेटचे अनेक मोठे दिग्गज भारतीय संघावर दाव लावत आहेत. टीम इंडियाने टी-20 वर्ल्डकपचे दोन्ही सराव सामने जिंकून आपला दावा आणखी मजबूत केला आहे.

    नवी दिल्ली, 21 ऑक्टोबर: टी20 वर्ल्डकपला (ICC T20 World Cup 2021) सुरुवात झाली असून 24 ऑक्टोबरला टीम इंडिया आणि पाकिस्तान (INDvsPAK) यांच्यात महामुकाबला होणार आहे. दरम्यान, वर्ल्डकपपूर्वी खेळवण्यात आलेल्या सराव सामन्यात भारताची(Team India) कमालीची कामगिरी पाहता क्रिकेट जगतात टी20 वर्ल्डकपचा यंदाचा प्रबळ दावेदार टीम इंडिया असणार अशी चर्चा रंगली आहे. हा विश्वास केवळ दिग्गजांनी व्यक्त केला नसून पाकिस्तानच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक इंझमाम उल हक (Inzamam-ul-Haq) यांनीदेखील हा विश्वास व्यक्त केला आहे. टीम इंडिया 24 आक्टोबरला दुबईच्या मैदानात पाकिस्तान विरुद्ध भिडणार आहे. स्पर्धेतील हा सामना हायहोल्टेज मानला जातो. दरम्यान, इंजमाम-उल-हक यांनी धक्कादायक विधान केले आहे. इंजमाम यांनी भारतीय संघाला जिंकण्याची अधिक शक्यता आहे. असे म्हटले आहे. भारत- पाकिस्तान मॅचनंतर लगेच BCCI घेणार मोठा निर्णय, फॅन्सची संपणार प्रतीक्षा टी-20 वर्ल्डकपमधील सर्वात प्रमुख दावेदारांबद्दल बोलायचे तर जागतिक क्रिकेटचे अनेक मोठे दिग्गज भारतीय संघावर दाव लावत आहेत. टीम इंडियाने टी-20 वर्ल्डकपचे दोन्ही सराव सामने जिंकून आपला दावा आणखी मजबूत केला आहे. सराव सामन्यांमध्ये सलग दोन सामने जिंकल्यानंतर, आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना इंजमाम-उल-हक म्हणाले, “कोणत्याही स्पर्धेत असे म्हणता येणार नाही की हा संघ विजेतेपद पटकावेल. त्याऐवजी पाहिले जाते की कोणत्या संघाला जिंकण्याची अधिक शक्यता आहे. माझ्या मते उर्वरित संघापेक्षा भारतीय संघाला ही स्पर्धा जिंकण्याची अधिक शक्यता आहे. तसेच, भारताकडे टी-20 फॉरमॅटचे अनुभवी खेळाडू आहेत. भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सराव सामना सहज जिंकला. अशा खेळपट्टीवर भारतीय संघ हा जगातील सर्वात धोकादायक संघ आहे. आजही जर आपण पाहिले तर त्यांनी 155 धावांच्या लक्ष्याचा सहज पाठलाग केला आणि त्याला विराट कोहलीची गरजही नव्हती. असे मतही इंजमामने यांनी यावेळी व्यक्त केले. वार्मअप मॅच मधील Team India ची खेळी पाहून मायकल वॉनचा यु-टर्न यासोबतच, 24 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्यावर भाष्य करत इंजमाम म्हणाले, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना फायनलपूर्वी फायनल सामन्यासारखा आहे. या प्रकारचा प्रचार इतर कोणत्याही स्पर्धेसारखा नाही. काही दिवसपूर्वी, हदय विकाराचा झटका आल्याने इंजमाम यांना रुग्णालयात दाखल केले होते. क्रिकेट पाकिस्तानने दिलेल्या माहितीनुसार सोमवारी इंझमामला मायनल हार्ट अटॅक आला. त्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या त्यांची प्रकृसी बरी आहे.
    Published by:Dhanshri Otari
    First published:

    Tags: India vs Pakistan, T20 cricket, T20 league, T20 world cup

    पुढील बातम्या