मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND VS ENG: 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार जिंकल्यानंतर ऋषभ पंतने मागितली माफी; म्हणाला...

IND VS ENG: 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार जिंकल्यानंतर ऋषभ पंतने मागितली माफी; म्हणाला...

IND vs ENG: 23 वर्षीय खेळाडू ऋषभ पंतने 'मॅन ऑफ द मॅच'चा (Man Of the match) पुरस्कार जिंकल्यानंतर या कारणासाठी माफी मागितली आहे.

IND vs ENG: 23 वर्षीय खेळाडू ऋषभ पंतने 'मॅन ऑफ द मॅच'चा (Man Of the match) पुरस्कार जिंकल्यानंतर या कारणासाठी माफी मागितली आहे.

IND vs ENG: 23 वर्षीय खेळाडू ऋषभ पंतने 'मॅन ऑफ द मॅच'चा (Man Of the match) पुरस्कार जिंकल्यानंतर या कारणासाठी माफी मागितली आहे.

अहमदाबाद, 06 मार्च: इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यासाठी भारताचा किपर आणि बॅट्समन ऋषभ पंतला (Rishabh Pant) 'मॅन ऑफ द मॅच'चा पुरस्कार देण्यात आला.  ऋषभने 118 बॉलमध्ये 101 रन्स केल्या आहेत. या बहुमोल खेळीदरम्यान पंतने संयम आणि आक्रमकतेचा समतोल राखला होता. त्यामुळे पंतला आऊट करणं इंग्लंडच्या बॉलर्सना अवघड गेलं. पंतच्या या  खेळीचं कर्णधार विराट कोहलीने आणि जो रुटने देखील कौतुक केलं आहे. या 23 वर्षीय खेळाडूने 'मॅन ऑफ द मॅच'चा (Man Of the match) पुरस्कार जिंकल्यानंतर  फारसं काही बोलला नाही, तो नेहमीप्रमाणे हसत होता.

मैदानात खेळताना तुझ्यासाठी कोणती गोष्ट सर्वाधिक महत्त्वाची ठरली? असं विचारलं असता, ऋषभने खास उत्तर दिलं आहे. तो म्हणाला की, 'मला वाटतं की हार न मानता सतत सराव करणं ही गोष्ट माझ्यासाठी महत्त्वाची ठरली. कारण यामुळे माझा आत्मविश्वास वाढला. परिणामी बॅटींगसोबतच विकेटकीपिंगमध्ये देखील सुधारणा झाली.' त्याच्यासाठी या खेळीचं महत्त्व अनन्यसाधारण आहे, कारण टीम इंडिया दबावात आली होती. या परिस्थितीतून टीमला बाहेर काढण्यासाठी ही खेळी महत्त्वपूर्ण ठरली.

रिव्हर्स फ्लिक पून्हा खेळणार

यावेळी पंत म्हणाला की, हे शतक माझ्यासाठी खूपच महत्त्वाचं होतं. कारण टीम दबावात आली होती. आम्ही 146 रन्सच्या मोबदल्यात सहा विकेट्स गमावल्या होत्या. जेव्हा टीमला गरज असेल, तेव्हा शानदार खेळी करणं यापेक्षा चांगलं काही असूच शकत नाही. जेम्स अँडरसनला 'रिव्हर्स फ्लिक' शॉट मारण्याबाबत विचारलं असता पंत म्हणाला, 'मला वेगवान गोलंदाजाने अशाप्रकारचा चेंडू टाकल्यास त्याला पून्हा रिव्हर्स फ्लिक नक्की मारेन.'

हे ही वाचा -IND vs ENG : आशिष नेहरासोबतच्या टीम इंडियाच्या या खेळाडूला ओळखलंत का?

विकेट्स मागे प्रतिस्पर्धी खेळाडूवर कमेंट केल्याबद्दल पंतने मागितली माफी

पंत केवळ फलंदाजीने प्रेक्षकांचं मनोरंजन करीत नाही, तर तो  स्टंपच्या मागे उभं राहून अनेक गंमती जमती करत असतो. त्याने केलेल्या टिप्पण्यांनी अनेक चाहत्यांना आकर्षित करतात. हर्ष भोगले यांनी तर असं म्हटलं की, पंतने कॉमेंन्ट्री करण्याच्या बाबतीत माझ्यासारख्या अनुभवी कॉमेन्टेटरलाही मागं टाकलं आहे. याचं उत्तर देताना ऋषभ आपलं हास्य रोखू शकला नाही. तो म्हणाला की 'ही माझी प्रशंसा आहे, पण माफ करा, ही बाब तुमच्यासाठी एक समस्या बनत आहे.' तो पुढे म्हणाला की,' मी स्वतः खूश राहण्यासाठी आणि इतरांना खुशी देण्यासाठी क्रिकेट खेळतो, असा विश्वास बाळगूनच मी लहानाचा मोठा झालो आहे.'

First published:

Tags: Cricket, India vs england, Rishabh pant