मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG: दुहेरी शतकानंतरही जो रुट मोडू शकला नाही धोनीचा 'हा' विक्रम

IND vs ENG: दुहेरी शतकानंतरही जो रुट मोडू शकला नाही धोनीचा 'हा' विक्रम

जो रुटने (Joe Root) भारत दौऱ्यातील पहिल्या कसोटी सामन्यात दमदार फलंदाजी करत कसोटी इतिहासातले अनेक विक्रम (Break Records) मोडीत काढले आहेत. परंतु भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीचा (Ms Dhoni) एक विक्रम त्याला मोडता आला नाही.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk
चेन्नई, 07 फेब्रुवारी: भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या टेस्टमध्ये इंग्लंडचा कॅप्टन जो रुटनं (Joe Root) डबल सेंच्युरी (Double century) झळकावली आहे. रुटची ही शंभरावी टेस्ट (100th Test match) आहे. शंभराव्या टेस्टमध्ये डबल सेंच्युरी  करणारा तो क्रिकेट विश्वातील पहिला बॅट्समन ठरला आहे. 1877 साली ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात मेलबर्नमध्ये पहिली टेस्ट मॅच खेळवली गेली होती. तेव्हापासून आतापर्यंत एकाही खेळाडूला असा विक्रम करता आला नव्हता. जो रुटने भारत दौऱ्यातील पहिल्या कसोटी सामन्यात दमदार फलंदाजी करत कसोटी इतिहासातले अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. सामन्याच्या पहिल्या दिवसाअखेर त्यानं शतक केलं तर दुसऱ्या दिवसाअखेर त्यानं द्विशतक ठोकलं. या अभूतपूर्व कामगिरीच्या जोरावर त्याने ब्रेंडन मॅक्यूलम, सर डॉन ब्रॅडमन अशा दिग्गजांचे मोठमोठे विक्रम मोडले आहेत. परंतु भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीचा एक विक्रम त्याला मोडता आला नाही. इंग्लंडची अवस्था 2 आऊट 48 अशी असताना जो रुट बॅटिंगला उतरला होता. सध्या कमालीच्या फॉर्मात असलेल्या रुटनं सिबले सोबत तिसऱ्या विकेटसाठी महत्त्वाची भागिदारी केली. या डावात त्याने 377 चेंडूंचा सामना करताना 218 धावा केल्या. यादरम्यान त्याने 2 षटकार आणि 19 चौकार मारले आहेत.

(वाचा - हसन अलीची जबरदस्त गोलंदाजी, बोल्ड झाल्यानंतरही फलंदाज पाहतच राहिला, पाहा VIDEO)

कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करण्याचा शानदार विक्रम एमएस धोनीच्या नावावर आहे. त्याने 2013 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 224 धावा करत या विक्रमाची नोंद आपल्या नावे केली होती. जेव्हा रुटने द्विशतक पूर्ण केलं, तेव्हा धोनीचा हा विक्रम मोडेल असं सर्वांना वाटत होतं. पण भारताचा डावखुरा फिरकीपटू शाहबाज नदीमने जो रुटला 218 धावांवर पायचित करत पव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यामुळे 8 वर्षांपूर्वी धोनीने केलेला हा विक्रम अबाधित राहिला आहे. चेन्नईतील मैदानावर सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर कसोटी सामन्यात भारताकडून सर्वाधिक धावा करण्याचा मान भारताचा माजी धडाकेबाज फलंदाज विरेंद्र सेहवागच्या नावावर आहे. सेहवागने 2008 मध्ये दक्षिण आफ्रिकाविरुद्ध याच मैदानावर 319 धावांची तुफानी खेळी केली होती. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर करुण नायर असून त्याने इंग्लंडविरुद्ध नाबाद 303 धावा केल्या होत्या. याशिवाय भारताचा माजी कर्णधार सुनिल गावसकर यांनी मैदानावर 236 धावांची खेळी साकारली होती. या यादीत महेंद्रसिंह धोनी चौथ्या क्रमांकावर असून त्याने कर्णधार म्हणून 224 धावा पटकावल्या होत्या.
First published:

Tags: Cricket news, MS Dhoni

पुढील बातम्या