सानियानंतर आणखी एक भारतीय पाकची सून, 'या' क्रिकेटपटूसोबत अडकणार विवाहबंधनात

सानियानंतर आणखी एक भारतीय पाकची सून, 'या' क्रिकेटपटूसोबत अडकणार विवाहबंधनात

हरियाणाच्या नूंह भागात राहणारी तरूणी लवकरच पाकिस्तानची सून होणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 30 जुलै : भारताची दिग्गज टेनिसपटू सानिया मिर्झानंतर आता आणखी एक भारताची लेक पाकिस्तानची सून होणार आहे. सानिया मिर्झानं पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकसोबत विवाह केला होता, त्यांना एक मुलगाही आहे. आता हरियाणाच्या नूंह भागात राहणारी शामिया आरजू पाकिस्तानच्या क्रिकेटरसोबत निकाह करणार आहे. पाकचा जलद गोलंदाज हसन अलीसोबक शामिया पुढच्या महिन्यांत लग्नबंधनात अडकणार आहे. शामिया एअर आमीरातमध्ये फ्लाईट इंजिनिअर आहे.

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात जन्माला आलेला हसन अली आणि हरियाणाची निवासी शामिया यांचा विवाह दुबईच्या एटलांटिस पाम जुबेरा पार्क हॉटेलमध्ये होणार आहे. तर, हसन अलीनं 2013मध्ये स्थानिक क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. त्यानंर 2016मध्ये पाकिस्तानकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 2017च्या चॅम्पियन ट्रॉफी संघातही त्याला समावेश करण्यात आला होता. हसन अलीच्या नावावर 50 एकदिवसीय विकेट आहेत. हसन अली शेवटचा सामना वर्ल्ड कपमध्ये भारताविरोधात खेळला होता.

वाचा- विराट म्हणतो संघात वाद नाही, पण 'हे' फोटो सांगतात वेगळीच कहानी!

17 ऑगस्टला दुबईला रवाना होणार

अमर उजालानं दिलेल्या माहितीनुसार, शामिया परिवारातील 10 सदस्य 17 ऑगस्टला दुबईला रवाना होणार आहेत. शामियाचे वडील, लियाकत अलीनं, "मुलीचे लग्न तर करायचे आहे. मग मुलगा भारताचा असो किंवा पाकिस्तानचा, याचा काही फरक पडत नाही. फाळणीनंतर आमचे नातेवाईक पाकिस्तानात गेले", असे सांगितले.

वाचा- IPL खेळण्यासाठी 'या' पाक खेळाडूला सोडायचा आहे देश?

असा ठरला विवाह

शामिया आणि हसन अली यांचे जुने पारिवारिक संबंध आहेत. शामियाचे वडील लियाकत हे पाकिस्तानचे माजी खासदार सरदार तुफैले आणि त्यांचे बाबा सख्खे भाऊ होते. फाळणीनंतर त्यांचे परिवार भारतात स्थानिया झाला. तर, तुफैले यांचा परिवार पाकिस्तानमध्ये स्थानिय झाला. त्यांच्यामुळं शामिया आणि हसन अली यांची ओळख झाली.

वाचा- 'याच्यासारखं दुर्दैव काहीच नाही', रोहितसोबतच्या वादावर विराटनं केला मोठा खुलासा

VIDEO: देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार आमने-सामने, सकाळच्या टॉप 18 बातम्या

Published by: Akshay Shitole
First published: July 30, 2019, 10:38 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading