रोहितनं Unfollow केल्यानंतर आता 'या' दोन क्रिकेटपटूंनी केलं अनुष्काला follow!

Rohit Sharma and Virat Kohli : वर्ल्ड कपनंतर रोहित आणि विराट यांच्यात वादाला सुरुवात झाली होती.

News18 Lokmat | Updated On: Jul 29, 2019 01:54 PM IST

रोहितनं Unfollow केल्यानंतर आता 'या' दोन क्रिकेटपटूंनी केलं अनुष्काला follow!

मुंबई, 29 जुलै : वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघ आज रवाना होत आहे. मात्र या सगळ्यात विराट आणि रोहित शर्मा यांच्यातील वादाच्या चर्चा वाढल्या आहेत. यातच रोहित शर्मानं विराटची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्माला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्यानंतर हा वाद आणखी चिघळला आहे. रोहित-विराट वर्ल्ड कपनंतर एकमेकांशी बोललेही नाही आहेत. रोहितनं यापूर्वी कोहलीलाही अनफॉलो केले होते. पण, कोहली इंस्टाग्रामवर अजूनही रोहितला फॉलो करतो. तर, रोहितची पत्नी कोहलीच्या फ्रेंड लिस्टमध्ये अजूनही नाही. दरम्यान आता भारतीय संघातील दोन खेळाडूंनी अनुष्काला फॉलो केले आहे.

वर्ल्ड कपनंतर विराट आणि रोहित यांच्यातील वादा वाढला होता. दरम्यान त्यानंतर अनुष्काच्या माध्यमातून रोहितनं विराटवर राग काढला. या सगळ्या प्रकारानंतर आता केएल राहुल आणि युजवेंद्र चहल यांनी अनुष्काला फॉलो करण्यास सुरुवात केली आहे. राहुल आणि चहल हे दोघंही विराट आणि अनुष्काच्या जवळचे मानले जातात. चहल आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या संघाकडून म्हणजेच आरसीबीकडून खेळतो.

वाचा-टीम इंडिया वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी आज होणार रवाना, संघातील वाद मात्र चव्हाट्यावर

अनुष्काचा रोहितवर पलटवार

Loading...

आता अनुष्का शर्मानं आपल्या इन्स्टाग्राम स्टेट्सवर, "एका बुद्धिमान व्यक्तीनं एकदाही काही मत व्यक्त केलेले नाही. फक्त खोट्यात अडकलेला खरेपणा हा या शांततेला तोडू शकतो", असे लिहत रोहित शर्मावर पलटवार केला आहे. त्यामुळं आता रोहित-विराट यांच्यातील वाद आता मैदानाबाहेरही पोहचला आहे. दरम्यान 3 ऑगस्टपासून वेस्ट इंडिज दौऱ्यावर भारतीय संघ जाणार आहे. याकरिता कर्णधार म्हणून विराट कोहलीला कायम ठेवण्यात आले आहे.

वाचा-रोहित-विराट वादाला नवं वळण, कोहली पत्रकार परिषद घेणार पण...

अशी होती संघात गटबाजी

सुत्रांच्या माहितीनुसार क्रिकेट प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांचा कर्णधार विराट कोहलीला पाठींबा आहे. त्यामुळेच आफ्रिका आणि इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत पराभव होऊनही विराटवर कारवाई करण्यात आली नव्हती, असा आरोप करण्यात आला होता.

वाचा-भारताला मिळाला मलिंगा! एकच डोळा असून टाकतो बुमराहसारखा यॉर्कर

VIDEO: गंगापूर धरण 80 टक्के भरलं; सोमेश्वर धबधबा खळखळला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 29, 2019 01:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...