नवी दिल्ली, 17 जानेवारी: 'संधी मिळाली तर Team India चा टेस्ट क्रिकेट कॅप्टन व्हायला आवडेल. तो माझा सन्मान असेल', असं मत रोहित शर्मा, के. एल. राहु, ऋषभ पंत या चर्चेतल्या नावांनी नव्हे तर भारतीय संघातल्या एका वेगवान गोलंदाजाने व्यक्त केलं आहे. विराट कोहलीने भारतीय टेस्ट क्रिकेट टीमच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर क्रिकेट जगतात खळबळ उडाली होती. आता सध्या रिकाम्या असलेल्या या कर्णधारपदावर कोणाची वर्णी लागणार हे अद्याप निश्चित झालेलं नाही.
संधी चालून आली, तर मला कसोटी क्रिकेटचा संघप्रमुख व्हायला आवडेल, असं जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah ready to lead Team India) म्हणाला आहे. काही महिन्यांपूर्वीच विराट कोहली Team India चा कॅप्टन म्हणून पायउतार झाला. T20 World Cup नंतर त्याने T20 टीमचा कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर गेल्या महिन्यात One day cricket team च्या कर्णधारपदावरूनही BCCI ने दूर केलं. तरीही कसोटी टीमचा विराट कर्णधार होता. पण दोन दिवसांपूर्वी आपण तेही पद सोडत असल्याचं त्याने सोशल मीडियावर जाहीर केलं.
आता कर्णधारपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार यावरूनच चर्चा आहे. रोहित शर्मा एक दिवसीय क्रिकेट टीमचा कर्णधार आहे. T20 च्या कॅप्टन्सीची धुराही त्याच्यार आहे. त्यामुळे सहाजिकच Test Team चा कर्णधार म्हणून त्याचं नाव अग्रभागी आहे.
IND vs SA : टीम इंडियाच्या जखमेवर आफ्रिकेच्या कॅप्टननं चोळलं मीठ!
पण रोहितचं वय लक्षात घेता BCCI कदाचित कसोटी क्रिकेटच्या कर्णधारपदासाठी इतर एखाद्या तरुण खेळाडूचं नाव पुढे करू शकतो. या स्पर्धेत मग ऋषभ पंत, के. एल. राहुल यांचं नाव चर्चेत होतं. आता बुमराहने स्वतःहून कर्णधारपदाबद्दल मत व्यक्त केल्याने तोही या स्पर्धेत असल्याचं उघड झालं आहे.
रोहितच्याच नावाची माध्यमात चर्चा
दक्षिण आफ्रिका विरुद्धची वन-डे मालिका संपल्यानंतर बीसीसीआय रोहितच्या नावाची औपचारिक घोषणा करेल, असे वृत्त 'इनसाईड स्पोर्ट्स' ने बीसीसीआय अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिले आहे.
IND vs SA : टीम इंडियाच्या जखमेवर आफ्रिकेच्या कॅप्टननं चोळलं मीठ!
या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 'रोहित शर्मा टेस्ट टीमचा कॅप्टन होणार यामध्ये कोणतीही शंका नाही. रोहितला दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी टेस्ट टीमचा व्हाईस कॅप्टन करण्यात आले होते. आता विराटने राजीनामा दिल्यानंतर त्याची कॅप्टनपदी नियुक्ती होईल. याबाबत लवकरच औपचारिक घोषणा करण्यात येईल.
रोहितच्या फिटनेसची समस्या
बीसीसीआच्या अधिकाऱ्यानं रोहित शर्माला कॅप्टन होण्यासाठी एका अटीचे पालन करावे लागेल असंही स्पष्ट केले आहे.
विराट कोहलीनं कॅप्टनसी सोडताना फेटाळला BCCI चा मोठा प्रस्ताव
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ' निवड समितीचे अधिकारी रोहितशी फिटनेस आणि वर्क लोडबाबत चर्चा करतील. रोहित सध्या वन-डे आणि टी20 टीमचा कॅप्टन आहे. टेस्ट टीमचा कॅप्टन झाल्यानंतर त्याचा वर्क लोड आणखी वाढणार आहे. आगामी काळात त्याला सर्व प्रकारातील क्रिकेटसाठी स्वत:ला फिट ठेवावे लागेल. रोहितसाठी फिटनेस ही एक समस्या आहे. निवड समितीचे अधिकारी त्याच्याशी याबाबत चर्चा करतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.