मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

द्रविडनंतर व्यंकटेश प्रसाद म्हणतो,'मी इंदिरा नगरचा गुंडा' ऐतिहासिक फोटो केला शेअर

द्रविडनंतर व्यंकटेश प्रसाद म्हणतो,'मी इंदिरा नगरचा गुंडा' ऐतिहासिक फोटो केला शेअर

भारताचा माजी फास्ट बॉलर, राहुल द्रविडचा सहकारी आणि बंगळुरुचा क्रिकेटपटू व्यंकटेश प्रसाद (Venkatesh Prasad) याने एक एक ऐतिहासिक फोटो ट्विट करत 'मी इंदिरा नगरचा गुंडा' आहे, असं सांगितलं आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 11 मार्च : टीम इंडियातीलच (Team India) नाही तर संपूर्ण क्रिकेट विश्वातील शांत आणि संयमी खेळाडू म्हणून राहुल द्रविड (Rahul Dravid) प्रसिद्ध आहे. क्रिकेटच्या मैदानामध्ये राहुल द्रविडला राग अनावर झाल्याचं आपण कधीच पाहिलेलं नाही, पण आयपीएल 2021 (IPL 2021) सुरू होण्याआधी केलेल्या एका जाहिरातीमध्ये राहुल द्रविडचा पारा चांगलाच चढल्याचं दिसत आहे. 'इंदिरानगर का गुंडा हूं मै' असं म्हणत ट्रॅफिकमध्ये अडकलेला राहुल द्रविड समोरच्या गाडीवर बॅटने मारत आहे.

राहुल द्रविडची ही जाहिरात चांगलीच व्हायरल (Viral) झाली आहे.  राहुल द्रविडला या अवतारात कधीच बघितलं नव्हतं, असं टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) म्हणाला आहे. द्रविडच्या फॅन्सना देखील त्याचं हे नव रुप पाहून आश्चर्याचा धक्का बसला होता. पण त्याचबरोबर त्यांनी द्रविडच्या अभिनयाची जोरदार प्रशंसा देखील केली.

प्रसाद उतरला मैदानात!

भारताचा माजी फास्ट बॉलर, राहुल द्रविडचा सहकारी आणि बंगळुरुचा क्रिकेटपटू व्यंकटेश प्रसाद (Venkatesh Prasad) हा देखील ही जाहिरात पाहून मैदानात उतरला आहे. त्याने एक ऐतिहासिक फोटो ट्विट करत 'मी इंदिरा नगरचा गुंडा' आहे, असं सांगितलं आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात 25 वर्षांपूर्वी 1996 साली झालेल्या मॅचचा तो फोटो आहे.  वर्ल्ड कप क्वार्टर फायनलची ती मॅच बंगळुरुच्याच चिन्नास्वामी स्टेडियमवर झाली होती. त्या मॅचमधील पाकिस्तानचा कॅप्टन आमिर सोहेल (Aamir Sohail) याने एक फोर मारल्यानंतर प्रसादला डिवचलं होतं.

सोहेलनं प्रसादच्या बॉलिंगवर फोर लगावला. त्यानंतर तो बॉल गेला त्या दिशेन बॅट दाखवत, मी तिथं पुन्हा फोर मारणार आहे, असा इशारा सोहेलला दिला. सोहेलच्या या उर्मट वर्तनाला प्रसादनं चोख उत्तर दिलं.  त्यानं अगदी पुढच्याच बॉलवर सोहेलला बोल्ड केलं. या घटनेला आता 25 वर्ष झाली असली तरी ही घटना भारतीय फॅन्स विसरलेले नाहीत. व्यंकटेश प्रसादनं या ऐतिहासिक घटनेचा फोटो शेअर करत 'मी इंदिरा नगरचा गुंडा आहे' (#IndiraNagarkaGunda) या शब्दात सोहेलला ट्रोल केलं आहे.

( वाचाधोनीमुळे झाला CSK चा पराभव? वाचा काय आहेत कारणं... )

व्यंकटेश प्रसादचं हे ट्विट चांगलंच व्हायरल झालं आहे. अनेक फॅन्सना हे ट्विट आवडले असून त्या निमित्ताने पुन्हा एकदा क्रिकेट फॅन्स भारत-पाकिस्तान लढतीमधील 'त्या' आठवणीला उजाळा देत आहेत.

First published:

Tags: Cricket, Photo viral, Tweet