IPL 2019 : ...आणि रैनानं घेतला जडेजाचा KISS, पाहा VIDEO

IPL 2019 : ...आणि रैनानं घेतला जडेजाचा KISS, पाहा VIDEO

रविंद्र जडेजानं घेतलेला हा झेल पाहून...जडेजा सुपरमॅन असल्याचा भास होईल...

  • Share this:

चेन्नई, 31 मार्च : चेपॉकवर राजस्थान विरोधात हल्लाबोल करत धोनीनं चेन्नईला सावरले. शेवटच्या ओव्हरमध्ये धोनीनं लगातार तीन सिक्स मारत 153च्या स्ट्राईर रेटनं 75 धावा केल्या. आणि राजस्थानसमोर 176 धावांचे आव्हान ठेवले. मात्र, या धावांचे पाठलाग करताना, राजस्थानच्या फलंदाजांना चांगले यश आले नाही.पहिल्याच ओव्हरमध्ये दुसऱ्याच बॉलवर दिपक चहरनं राजस्थानचा कर्णधार अजिंक्य रहाणेला 0 वर बाद केले. रविंद्र जडेजानं उत्तम झेल घेत ही विकेट घेतली. पण या विकेटनंतर एक अनोखा प्रसंग मैदानावर पाहायला मिळाला. रविंद्र जडेजानं उत्तम झेल घेतल्यानंतर सुरेश रैनाला रहावले नाही आणि त्यानं चक्क जडेजाला किस केले.कर्णधार रहाणेनंतर संजू सॅमसनच्या रुपात राजस्थानला दुसरा धक्का बसला. संजू 8 धावा करत बाद झाला. तर, लगेचच चेन्नईच्या शार्दुल ठाकूरने जोस बटलरला आऊट करत राजस्थानला तिसरा धक्का दिला.राजस्थानकरिता सध्या राहूल त्रिपाठी आणि स्टिव्ह स्मिथ फलंदाजी करत आहेत. दरम्यान राजस्थानला यंदाच्या हंगामात पहिला सामना जिंकायचा असल्यास स्मिथला चांगली फलंदाजी करावी लागणार आहे.


मलायका - अर्जुनच्या नात्यावर काय म्हणाला अरबाज?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 31, 2019 11:00 PM IST

ताज्या बातम्या