• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • T20 World Cup मध्ये खराब कामगिरी, भारताच्या दिग्गजांचा पत्ता कट, न्यूझीलंडविरुद्ध या खेळाडूंना संधी!

T20 World Cup मध्ये खराब कामगिरी, भारताच्या दिग्गजांचा पत्ता कट, न्यूझीलंडविरुद्ध या खेळाडूंना संधी!

टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडियाची (Team India) कामगिरी निराशाजनक झाली आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या दारूण पराभवामुळे टीम इंडियाचं सेमी फायनलला पोहोचण्याचं स्वप्न धूसर झालं आहे.

 • Share this:
  मुंबई, 2 नोव्हेंबर : टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडियाची (Team India) कामगिरी निराशाजनक झाली आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या दारूण पराभवामुळे टीम इंडियाचं सेमी फायनलला पोहोचण्याचं स्वप्न धूसर झालं आहे. टी-20 वर्ल्ड कप संपल्यानंतर लगेच न्यूझीलंडची टीम भारत दौऱ्यावर (India vs New Zealand) येणार आहे. या दौऱ्यातल्या टी-20 सीरिजमध्ये दिग्गज खेळाडूंना बाहेर ठेवून युवा खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता आहे. आयपीएल 2021 मध्ये ऑरेंज कॅप जिंकणारा ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि सर्वाधिक विकेट घेणारा आवेश खान (Avesh Khan) यांच्याशिवाय युझवेंद्र चहलला (Yuzvendra Chahal) न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 सीरिजसाठी संधी दिली जाऊ शकते. तर जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि मोहम्मद शमीला (Mohammad Shami) आराम मिळण्याची शक्यता आहे. फिटनेस आणि खराब फॉर्ममध्ये असलेल्या हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि भुवनेश्वर कुमारची (Bhuvneshwar Kumar) टीममधून हकालपट्टी होणार हे निश्चित मानलं जात आहे. पांड्याचा पर्याय म्हणून व्यंकटेश अय्यरला (Venkatesh Iyer) स्थान दिलं जाऊ शकतं. 2022 सालचा टी-20 वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियातल्या खेळपट्टीवर होणार आहे, त्यामुळे जम्मू-काश्मीरचा फास्ट बॉलर उमरान मलिकच्या (Umran Malik) नावावरही निवड समिती विचार करू शकते. उमरान मलिकने नुकत्याच झालेल्या आयपीएलमध्ये सगळ्यात जलद बॉल टाकला होता. याशिवाय अक्षर पटेल, श्रेयस अय्यर, दीपक चहर यांचंही टी-20 टीममध्ये पुनरागमन होईल, असं सांगितलं जात आहे. रोहित शर्मा कर्णधार? न्यूझीलंडविरुद्धची तीन मॅचची टी-20 सीरिज 17 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. विराट कोहलीने (Virat Kohli)टी-20 फॉरमॅटची कॅप्टन्सी सोडल्यामुळे रोहित शर्माला (Rohit Sharma) कर्णधारपदाची जबाबदारी मिळू शकते, पण रोहित शर्मा मागच्या वर्षापासून बायो-बबलमध्ये आहे आणि सलग क्रिकेट खेळत आहे, त्यामुळे फक्त न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 सीरिजसाठी केएल राहुलकडे (KL Rahul) टीमचं नेतृत्व दिलं जाऊ शकतं, अशीही माहिती आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि सचिव जय शाह (Jay Shah) एक ते दोन दिवसांमध्ये राष्ट्रीय निवड समितीसोबत ऑनलाईन बैठक करणार आहेत. या बैठकीत टीमच्या नेतृत्वाबाबत चर्चा करण्यात येईल. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपला जवळपास 11 महिने शिल्लक आहेत, तसंच या वर्षात टीम इंडिया एकही वनडे सीरिज खेळणार नाही. विराट वनडे टीमची कॅप्टन्सीही सोडणार? टीम इंडिया आता थेट फेब्रुवारी 2022 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध तीन वनडे मॅचची सीरिज खेळणार आहे, त्यामुळे बीसीसीआय 2023 वनडे वर्ल्ड कपच्या दोन वर्ष आधी योजना बनवण्याच्या तयारीत आहे, पण कॅप्टन्सीबाबत मात्र लगेच निर्णय होण्याची शक्यता कमी आहे. जून 2022 पर्यंत भारत घरच्या मैदानात 17 टी-20 आणि फक्त 3 वनडे खेळणार आहे, त्यामुळे फक्त तीन वनडेसाठी नव्या कर्णधाराची घोषणा व्हायची शक्यता कमी आहे. भारतीय टीम दक्षिण आफ्रिका दौऱ्यात वनडे सीरिज खेळणार आहे, त्यामुळे कोहली वनडे टीमचं नेतृत्वही सोडणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
  Published by:Shreyas
  First published: